*खंडाळी ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूक अभियान 2020*
*ll गावाच्या शास्वत भविष्यासाठी ll*
ग्रामस्थांच्या ठरलेल्या वचनाप्रमाणे अंतीम ग्रामसभा सरपंच पदाचे आरक्षण जाहिर होईल त्यादिवशी असेल अथवा निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या तारखेच्या आदल्या दिवशी होईल.अथवा हि सभा कधी घ्यायची हे ग्रामस्थांनी ठरवावी.
कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता वाचा व विचार करा.
आपल्या व आपल्या सर्वांच्या अवस्थेवर परिणाम करणारी व्यवस्था म्हणजे निवडणुक. जी योग्य त्या लोकशाही पद्धतीने झाली तरच ठिक नाहीतर त्या नावाखाली राजनिती करून झाली तर सर्वांच्या भविष्याचा बोजवारा उटणार हे निश्चित. म्हणून अशा अभियानातून अशा राजनितींना चपराक बसेल.
गांभीर्याने विचार करा की
सरपंच पद हे काही जहागीरी नाही की जी मिळावी म्हणून कोणतेही प्रयत्न करावेत. किंवा तो धंदा अथवा व्यवसाय नाही की परत यातून उत्पन्न घेता येईल. सरपंच पद हे इतके महत्वपूर्ण आहे की गावातील सर्व व्यक्तींच्या जन्मापूर्वी पासून ते त्याच्या मृत्युच्या नंतरच्या सर्व अवस्थांना व व्यवस्थेला त्याला न्याय देता आला पाहिजे व तशे ज्ञानही त्याकडे असणे आवश्यक आहे. गावातील शिक्षण, अर्थ, समाज, धर्म, संस्कृती,अशा अनेक विभागांचे भवितव्य सरपंचावर व त्याच्या ज्ञानात्मक निर्णय क्षमतेवर अवलंबून असते.
म्हणून सर्वांनी वैचारिक क्षमतेचा कस लाऊन सर्व उमेदवार निवडावे. सर्वात महत्वपूर्ण म्हणजे सरपंच व उपसरपंच हि पदे जेवढी महत्वाची तेवढेच महत्व ग्रामपंचायत सदस्याला आहे. कारण तोंडावर, डोळ्यावर व कानावर बोटे ठेऊन फक्त खूर्चीवर जावून बसणारा सदस्य काहीच कामाचा नाही. ग्रामपंचायत च्या कोणत्याही चुकीच्या कारभारावर त्याने आवाज उठविला पाहिजे.त्यामुळे सदस्य ते सरपंच हि सर्व पदे
योग्य व लायकच व्यक्तीला मिळावी म्हणून हे अभियान महत्वपूर्ण आहे.
*शनिवार दिनांक 8 नोव्हेंबर 2020*
*रोजी झालेल्या ग्रामसभेत*
*खंडाळी ग्रामपंचायत*
*निवडणुक बिनविरोध* *करण्यासंदर्भात*
1)
13 उमेदवार हे कोणत्या एका
पार्टीचे न असता वार्ड रचनेच्या
नियमानुसार संपूर्ण गावाच्या
आवडीचे असावेत
2)
सरपंच पदासाठी कोणत्याही जातीचे आरक्षण येवो त्या जातीतील सर्वोच्च सुशिक्षित, चरित्रवाण व गावचा रहिवाशी असलेला उमेदवार गाव ठरविणार, पार्टी
नाही.
3)
ज्यांनी यापूर्वी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच अथवा अगदी सदस्यत्व जरी मिळविले असले तरी त्यांनी परत निवडणुकीस ऊभा राहू नये
4)
सरपंच पदाचे आरक्षण जाहिर
होताच ग्रामसभा बोलाऊन
त्या पदासाठी निरव्यसनी,सुशिक्षित,चरित्रवाण,
तरूण व निस्वार्थी अशाच व्यक्तीची निवड करावी.
5)
सर्व पार्टी प्रमुखांनी निवडणुक लागू नये
याची जबाबदारी घ्यावी पण जर मुद्दाम निवडणूक लावली तर अशा पार्टीवर अथवा अशा बेजबाबदार गावद्रोही व्यक्तीवर गावाने बहिष्कार घालावा
6)
निवडणूक बिनविरोध करून आलेला सर्व बक्षीसपर निधी गावातील शैक्षणिक व्यवस्थेसाठी द्यावा
7)
शासन, प्रशासन व ग्रामस्थ यांचा
मेळ घालणारा उमेदवार असावा
8) कोणतेही व्यसन असलेला
उमेदवार नसावाच
9)
गावाच्या सर्व कारभाराचे नियोजन करण्याची क्षमता त्या
उमेद्वारामध्ये असावी
10)
जाती धर्माचे राजकारण नको
सर्वसमावेशक विचार असलेला
उमेदवार असावा
11)
पार्टी प्रमुख हाच निवडणुक
लागल्यास जबाबदार असेल
व अशा पार्टीस गावाने कितपत
सहकार्य करायचे हे ग्रामसभेत
ठरवायचे व अशा व्यक्ती बद्दल
गावानेच निर्णय घ्यायचा.
12) उमेदवार होऊ इच्छिणारया व्यक्तीने गावाच्या प्रगतीचे मुद्दे सांगावे
13) सरपंच व उपसरपंच या पदाचा व्यक्ती किमान पदवीधर तरी असावा.
14) गावातील काही उच्चशिक्षित, प्रतिष्ठीत,यशस्वी व उच्चस्थित व्यक्तींची मिळुन एक समीती करावी, या मध्ये गावातील पार्टी प्रमुख अथवा त्या पार्टीचा एक व्यक्ति प्रतिनिधीही असावा.गावातील कोणत्याही राजकीय पार्टीची चमचेगीरी करणारी मंडळी नसावीत.
15) खंडाळी गावाच्या वैभवात भर टाकलेले अथवा त्यासाठी प्रयत्न केलेल्या व्यक्तींनी उमेदवारीसाठी इच्छा ठेवावी.


No comments:
Post a Comment