Breaking

Friday, 11 December 2020

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- शौचालयास अनुदान द्या अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर कुटूंबासहित उपोषणाला बसू.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - शौचालयास अनुदान द्या अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर कुटूंबासहित उपोषणाला बसू - या बाबत सविस्तर वृत्त असे की मोडनिंब येथील राहिवासी असलेले सुग्रीव संभाजी भांगे गेल्या 1 वर्षापासून मोडनिंब ग्रामपंचायतीकडे शौचालय अनुदानासाठी मागणी करत आहेत व त्यांनी स्वखर्चाने शौचालयही बांधले आहे परंतु गेल्या एक वर्षापासून त्यांना मोडनिंब ग्रामपंचायतीने त्यांचे शौचालय मंजूर असूनही अनुदान दिले नाही व त्यांचे असे म्हणणे आहे की मोडनिंब ग्रामपंचायत माझ्यासोबत सूडबुद्धीने वागत असून मला व माझ्या कुटूंबाला मानसिक व नाहक त्रास देत आहे , व त्यांचे असे म्हणणे आहे की माझा मुलगा अपंग असून परिस्थितीही हलाखीची आहे व ग्रामपंचायतीला याबाबत अनुदान मागणी केली असता ग्रामपंचायत अनुदान देत नाही व ग्रामपंचायतीने पंचायत समिती कुर्डूवाडी यांना या संदर्भात जागेच्या अडचणीचे कारण दिले आहे, 






परंतु त्यांचे असे म्हणणे आहे की मी शौचालय स्वखर्चाने बांधले आहे व ग्रामपंचायत मोडनिंब अनुदान देण्यासाठी टाळाटाळ करत आहे व गाव शंभर टक्के हागणदारी मुक्त असताना सुद्धा गावात माझ्यावरती अन्याय होतो आहे तरी मला अनुदान न मिळाल्यास मी माझ्या कुटूंबासहित मोडनिंब ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषणास बसणार आहे अश्या मागणीचा अर्ज मोडनिंब येथील राहिवासी असलेले सुग्रीव संभाजी भांगे यांनी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांचेकडे देऊन अनुदान मागणी केली आहे व उपोषणाचा इशारा दिला आहे.

No comments:

Post a Comment