Breaking

Sunday, 6 December 2020

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- सहकार महर्षी कै. गणपतराव साठे यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त माढा शहरात भव्य टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धा.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - सहकार महर्षी कै.गणपतराव साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धा- याबाबत सविस्तर वृत्त असे की सहकार महर्षी कै. गणपतराव साठे यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त माढा शहरात नगराध्यक्ष चषक 2020 चे आधारस्तंभ मा.श्री. दादासाहेब साठे युवा ग्रुप माढा आयोजित भव्य टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 11 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश फी ही 2100 रूपये इतकी असेल तसेच फायनल सामना हा you tube लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात येईल. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक व ट्राॅफी  25132/- रु श्री.अजिनाथ माळी व श्री. रविंद्र कथले यांचेकडून,  द्वितीय पारितोषिक व ट्राॅफी 15132/- श्री. कल्याण बाबर यांचेकडून,  तृतीय पारितोषिक व ट्राॅफी 11132/- श्री. संतोष राऊत यांचेकडून, चतुर्थ पारितोषिक व ट्राॅफी 7132/- श्री. अन्नपुर्णा हाॅटेल यांचेकडून अशी चार पारितोषिके देण्यात येतील व अन्य काही वयैक्तिक बक्षीसेही देण्यात येतील तसेच स्पर्धेतील ट्राॅफी साठी नितिन साठे यांचे मार्फत व टेनिस बाॅल साठी हनुमंत माळी मेंबर यांचे मार्फत तसेच स्टेजसाठी राहूल लंकेश्वर, मा.नगराध्यक्ष समाधान धोंडीराम राऊत यांनी दिले आहेत व स्पर्धेचे ठिकाण माढा शहरातील जिल्हा परिषद प्रशाला मैदान वैराग रोड माढा येथे ह्या स्पर्धा खेळवण्यात येतील अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment