पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- डाॅ.दिलीप कुलकर्णी यांनी तयार केलेले औषध केंद्र सरकारच्या ICMR कडे- याबाबत सविस्तर वृत्त असे की मोडनिंब चे सुपूत्र डाॅ. दिलीप कुलकर्णी यांनी कोरोना साठी तयार केलेले पंचगव्य आयुर्वेद व ओझोन आधारित औषध हे केंद्र सरकाच्या ICMR कडे विषय मांडण्यासाठी सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डाॅ. विजयराज भटकर यांचेकडे सुपूर्द केले.
तसेच डाॅ. दिलीप कुलकर्णी यांनी तयार केलेले हे पंचगव्य आयुर्वेद व ओझन आधारित औषधाची सुमारे एक तास सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डाॅ. विजयराज भटकर यांनी माहीती घेतली व डाॅ. दिलीप कुलकर्णी यांनी याबाबत केलेले प्रयत्न व दिशा अत्यंत योग्य असून मी योग्य ठिकाणी ही माहिती सादर करेन असे आश्वासन सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डाॅ. विजयराज भटकर यांनी दिले.


No comments:
Post a Comment