Breaking

Tuesday, 24 November 2020

शिर्डी प्रतिनिधी/ पूर्व वैमन्यस्यातून शिर्डी येथे तरूणाची धारदार शस्त्राने हत्या.


- पूर्व वैमन्यस्यातून शिर्डी येथे तरूणाची धारदार शस्त्राने हत्या- याबाबत सविस्तर वृत्त असे की दिवाळी नंतर समोर आलेल्या या घटनेने शिर्डी हादरून गेले आहे. रविंद्र माळी उर्फ पिण्या याची अज्ञातांनी धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केली आहे. रात्री दहाच्या सुमारास  रविंद्र ची केल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला आहे. 






मिळालेल्या माहितीनुसार रविंद्र रात्री घराबाहेर असताना काही अज्ञातांनी त्याच्यावरती धारधार शस्त्राने हल्ला केला. हा प्रकार पूर्ववैमन्यस्यातून झाल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. 






शिर्डीत पुन्हा एकदा गुन्हे गारीने डोके वर काढले आहे. या प्रकरणी स्थानिकांनी तात्काळ आरोपीला अटक करण्यात यावी अशी मागणी जोर लावून धरली आहे. शिर्डीत गुन्हे गारीने डोके वर काढले असून या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. 





शिर्डीत साई मंदीरात आता हळूहळू भाविकांना दर्शनासाठी परवानगी दिली जात आहे व मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंन्सिंग आणी सर्व गोष्टीचे पालन करून भाविकांना दर्शन दिले जात असताना अशा प्रकारच्या घटना समोर येत असल्याने शिर्डी हादरून गेले आहे. 





पोलिसांनी गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या तरूणाची कसून चौकशी देखील केली आहे. मृत तरूणाचा शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर पुढील तपास करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment