Breaking

Monday, 23 November 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- बैलगाडी चालक-मालक संघटनेची खा. अमोल कोल्हे यांच्याशी बैठक.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- बैलगाडी चालक-मालक संघटनेची खा.अमोल कोल्हे यांच्याशी  बैठक-  
बैलगाडी शर्यतबंदीसंदर्भात न्यायालय व प्रशासकीय स्तरावर रणनीती ठरविण्यासाठी बैलगाडी चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नारायणगाव येथील जनसंपर्क कार्यालयात भेट घेऊन खा.अमोल कोल्हे यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत विविध पर्यायांवर विचारविनिमय करण्यात आला.याप्रसंगी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्त निकम, पुणे जिल्हा 






बैलगाडी  चालक मालक संघटनेचे विलासशेठ भुजबळ, बाळासाहेब आरुडे,के. के. थोरात, सुरेश मातेले व अन्य बैलगाडी मालक उपस्थित होते.आगामी संसद अधिवेशन काळात या विषयावर पाठपुरावा करीत आहोत. यासोबतच न्यायालयातील सुनावणी तातडीने व्हावी यासाठी राज्य सरकारच्या वतीने न्यायालयाकडे पाठपुरावा करण्यासाठी लवकरच राज्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्याकडे पुन्हा एकदा आढावा बैठक घेण्याचे आश्वासन खा.अमोल कोल्हे यांनी दिले.


No comments:

Post a Comment