पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- भाजपकडून विरोधी पक्ष संपवण्यासाठीच केंद्रीय यंत्रणांचा वापर... पृथ्वीराज चव्हाण- याबाबत सविस्तर वृत्त असे की भाजपच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्र राज्याची सर्व क्षेत्रात पिछाडी झाली आहे व आपले वाईट कर्म लपविण्यासाठीच आणी राज्यातील जनतेची दिशाभूल करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कडून केंद्रीय यंत्रणांचा वापर होत आहे. विरोधी पक्ष मोडून काढण्यासाठी, व त्या पक्षातील नेत्यांचे खच्चीकरण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कडून केंद्रीय यंत्रणांचा वापर होत आहे ही कृती निषेध करण्यासारखी असल्याचे वक्तव्य करत खच्चीकरण करण्याच्या हेतूने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई केल्याची शक्यता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
महाविकास आघाडी चे पदवीधर मतदार संघातील उमेदवार अरूण लाड आणी शिक्षक मतदारसंघातील उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यासाठी पृथ्वीराज चव्हाण आले होते. मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत चह्वाण म्हणाले की महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आल्यावर ही पहिली निवडणूक आहे.या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस ने संयुक्त पणे उमेदवार दिले आहेत. या दोन्ही उमेदवारांना शिवसेनेने पाठिंबा दिल्याने ते सध्या महाविकास आघाडी चे उमेदवार बनले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी आम्ही आज संयुक्त मेळावे घेतले.तसेच अनेक शिक्षण संस्थांना भेटी दिल्या. उद्या मी आणी जलसंपदामंत्री जयंत पाटील उर्वरित ठिकाणी संयुक्त दौरे करणार आहे.महाविकास आघाडी चे दोन्ही उमेदवार निवडून येतील अशी मला खात्री आहे.
भारतीय जनता पार्टी च्या या नितिला भेदण्यासाठी महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेवर आले आहे. भाजपच्या नाकर्तेपणामुळे राज्याची सर्व क्षेत्रात पिछाडी झाली आहे, विरोधी पक्ष मोडून काढण्यासाठी भाजपकडून केंद्रीय यंत्रणा चा वापर केला जात आहे, मलाही काही दिवसांपूर्वी प्राप्तीकर विभागाची नोटीस आली होती, जेष्ठ नेते शरद पवार, सुप्रियाताई सुळे यांनाही ईडीने नोटीस पाठवली होती, नोटीसा व केंद्रीय यंत्रणा चा वापर करत भाजप आकड्यांचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, विरोधी नेत्यांना, विरोधी पक्षांच्या प्रमुखांना टार्गेट करत भाजप या संस्थांचा गैरवापर करत आहे.
खरंच चूक असेल तर खटले भरा, कारवाई करावी, यापूर्वी राज्यात अशाप्रकारे अनेक नेत्यांना टार्गेट करत तुरुंगात टाकण्यात आले. अशा पद्धतीने कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षांनाही तुरुंगात टाकले होते, यंत्रणाचा तपास झाला असेल तर त्यातून काय पुढे आले, हे सुद्धा पुढे आले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. पक्ष आणी व्यक्ती बघून केंद्राकडून अशी कारवाई होते व त्याच धर्तीवर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई झाल्याची शक्यता चव्हाण यांनी वर्तवली आहे.


No comments:
Post a Comment