Breaking

Tuesday, 24 November 2020

मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- कोरोना महामारीचे संकट असताना शाळा, काॅलेजस चालू करण्याचा निर्णय निव्वळ गलथानपणा...डाॅ. संजय लोखंडे.


मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- कोरोना महामारीचे संकट असताना शाळा, काॅलेजस चालू करण्याचा निर्णय निव्वळ गलथानपणा...डाॅ.संजय लोखंडे- याबाबत सविस्तर वृत्त असे की कोरोना महामारीचे संकट अधिक तीव्र असताना शाळा, काॅलेजस चालू करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो निव्वळ गलथानपणा आहे असे मत राष्ट्रीय लोकशाही लढा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. संजय लोखंडे यांनी VBP NEWS सोबत बोलताना  व्यक्त केले आहे. 






त्यांचे असे म्हणणे आहे की पालकांच्या डोळ्यावर पट्टी टाकून , व तोंड बंद करण्याचा एक मोठा प्लॅन आहे, पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांची प्रवेश फी भरलेली आहे. प्रॅक्टीकल फी दिलेली आहे, मात्र त्याचा कोणत्याही विद्यार्थ्याला फायदा झाला नाही. उद्या याबाबत पालक शाळा, काॅलेजस वर अॅक्शन घेतील यासाठी शिक्षण व्यवस्थेने स्वतः च्या चुकांवर पडदा टाकण्यासाठी आपल्या मुलांच्या जीवाची बाजी लावलेली आहे असे राष्ट्रीय लोकशाही लढा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. संजय लोखंडे म्हणाले व पालकांनो विद्यार्थ्यांचे संपूर्ण कोरोनाचे लसीकरण झाल्याशिवाय मुलांना शाळेत पाठवू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment