पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- यंदा प्रती पंढरपूरच्या कार्तिकी यात्रेत विठुरायाचे फक्त मुखदर्शनच- कोरोना महामारी चे संकट अजून दूर झाले नसल्याने व शासनाच्या आदेशानुसार अटी आणि शर्तींचे पालन करून कार्तिकी एकादशीला धार्मिक विधी पार पाडून साजरा होईल पांडुरंगाचे केवळ मुखदर्शन होईल यात्रा किंवा जत्रा भरली जाणार नाही त्याची जबाबदारी संस्था घेणार नाही असा खुलासा येथील प्रति पंढरपूर व ऐतिहासिक अशा विठ्ठल मंदिर संस्थेने केला आहे यामुळे काही लाखांची उलाढाल ठप्प होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 50हून अधिक विठ्ठल रखुमाई मंदिरे आहेत रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव,चिंद्रवली, पूर्णगड यासह सर्वच ठिकाणी उत्सव होणार नाहीत फक्त धार्मिक विधी पार पडणार आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य मंदिरांमध्ये ते कोणतीही यात्रा किंवा जत्रा करण्यात येणार नाही त्यामुळे कार्तिकी एकादशीच्या यात्रेची प्रथा यंदा कोरोना महामारी मुळे खंडित होणार आहे यंदा आषाढी एकादशीला मंदिरे बंद असल्याने कोठेही यात्रा झाली नव्हती.
शहर व्यापारी संघाचे अध्यक्ष उदय पेठे यांनी सुद्धा सांगितले पोलिसांनी जी नोटीस जारी केली आहे तिचे सर्व व्यापाऱ्यांनी स्वागत केले आहे बाहेरील फिरते व्यापारी हे शहरामध्ये दाखल होतात व मध्यवर्ती बसस्थानकापासून संपूर्ण शहराला वेढा घालून आपली दुकाने फुटपाथवर थाटतात त्याला आमचा विरोध असून फेरीवाल्यांनी यंदा दुकाने थाटण्यास येऊ नये स्थानिक व्यापाऱ्यांनी दुकानासमोर अनावधानाने फेरीवाला येऊन बसल्यास त्याला सूचना द्यावी व्यापाऱ्यांनी दुकानातील माल बाहेर मांडू नये जिल्हा दंडाधिकार्यांनकडून आलेल्या सूचनांचे पालन करावे. असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
रत्नागिरी विठ्ठल मंदिर संस्थेने गर्दी व कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फक्त रूढी परंपरेनुसार मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी करण्याचे ठरवले आहे मूर्ख दर्शनाला येणाऱ्या नागरिकांना व भाविकांना मास्क सॅनिटायझर व सुरक्षित अंतर ठेवणे हे नियम पाळावे लागतील.
कार्तिकी निमित्त रत्नागिरीत होणाऱ्या यात्रेत परजिल्ह्यातील अनेक विक्रेते येतात यंदा यात्रेवर बंदी असल्याने विक्रेत्यांनी दुकान थाटल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे यात्रेमध्ये असंख्य प्रकारच्या वस्तूंची विक्री केली जाते त्यातून काही लाखांची उलाढाल होते मात्र यंदा जत्रा नसल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे.


No comments:
Post a Comment