बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- भररस्त्यात प्रेयसीला अॅसिड आणी पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न - पुण्याहून गावी परतताना रस्त्यातच 22 वर्षीय प्रेयसीला अॅसिड आणी पेट्रोल टिकून जाळल्याची हृदयद्रावक घटना बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरात उघडकीस आली आहे.
या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे, तब्बल 12 तास ही तरूणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्यात तडफडत होती.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शेळगाव येथील सावित्रा (वय 22) असं पिडीत तरूणीचे नाव आहे. ती शेळगावातील अविनाश राजुरे याच्यासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती.
दिनांक 13 नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही पुण्याहून गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते. दरम्यान, पहाटे 3 वाजेच्या सुमारास बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरात निर्मनुष्य ठिकाणी मांजरसुबा- केज हा मुख्य रस्त्यावरून जात असताना आरोपी तरूणाने गाडी थांबवली. त्यानंतर या तरूणाने रस्त्याच्या कडेला अगोदर तरूणीवर अॅसिड टाकले.
हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही, काही वेळाने त्याने पेट्रोल टाकून त्या तरूणीला पेटवून दिले. तरूणीला पेटवून दिल्यानंतर आरोपी तरूण घटनास्थळावरून फरार झाला. अॅसिड हल्ला आणी पेट्रोल ने 48% शरीर भाजले असून , काही वेळा नंतर रस्त्यावर वरून जाणार्याना आवाज आल्याने खड्यात पाहीले असता, अर्धवट जळालेल्या अवस्थेत तरूणी दिसली.त्यानंतर तातडीने पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
दुर्दैवी म्हणजे पहाटे 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. तेव्हा पासून ही तरूणी रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या खड्यात दुपारी 2 वाजेपर्यंत तडफडत होती. घटना स्थळी पोलिसांनी पोहचून पंचनामा केला. आणी जखमी तरूणीला स्वतः च्या गाडीतून नेकनूरला नेले तिथून रूग्ण वाहिकेने बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
पीडीतेचा जबाब नोंदवण्यात आला असून नेकनूर पोलिस स्टेशनचे ए.पी.आय. लक्ष्मण केंद्रे पुढील तपास करत आहेत. मात्र ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घडलेल्या या थरारक प्रकारामुळे माणूस जिवंत आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे.


No comments:
Post a Comment