मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- मोडनिंब मधील जि.प.प्राथमिक मुलींच्या शाळेतील शिक्षिका सौ.रत्नप्रभा संभाजी लादे मॅडम यांना रोटरी नेशनल आवार्ड पुरस्काराने सन्मानित- याबाबत सविस्तर वृत्त असे की मोडनिंब रोटरी क्लब च्या वतीने दिला जाणारा या वर्षी चा रोटरी नेशनल आवार्ड पुरस्कार हा मोडनिंब येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेतील शिक्षिका सौ.रत्नप्रभा संभाजी लादे मॅडम यांना रोटरी नेशनल आवार्ड पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
सध्या कोरोना महामारीमुळे सर्वच शाळा बंद असताना मुलींना आॅनलाईन शिक्षण देणे व त्याचबरोबर शाळेत विविध प्रकारच्या स्पर्धा परिक्षा राबविणे, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबविणे, ज्ञान रचनावाद, कथाकथन, कथालेखन, सेमी इंग्लिश, लोकसहभागातून शाळेत स्मार्ट टिव्ही व त्यातून विद्यार्थ्यांना शिक्षण देणे, क्रिडा, स्नेहसंमेलन, सहल, वनभोजन,
त्याचबरोबर शालेय पोषण आहाराचे नियोजन करणे,बुद्धीमत्ता, गणित, मराठी, इंग्रजी या विषयावरती त्यांचे प्रभुत्व आहे. तसेच विद्यार्थ्यांनकडून घरचा अभ्यास करून घेणे, चित्रकला स्पर्धा राबविणे, वृक्षसंवर्धन व वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम इत्यादी उपक्रम त्या राबवत आहेत त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मोडनिंब रोटरी क्लबने त्यांना रोटरीनेशनल आवार्ड पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे व या पुरस्काराबद्दल त्यांचे शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष सुदर्शन कोळी व उपाध्यक्षा सौ.सूचिता पाटील मॅडम तसेच पत्रकार सतिश निंबाळकर, साईदास चह्वाण, सदस्य व सदस्या, शाळेचे केंद्रप्रमुख मा सुभाष दाढे सर, मुख्याध्यापिका बिनगे मॅडम व सर्व शिक्षक व शिक्षिका स्टाफ यांनी अभिनंदन केले आहे.


No comments:
Post a Comment