Breaking

Friday, 6 November 2020

पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- मेहुण्याला धमकी दिल्याप्रकरणी माजी खासदार संजय काकडेंसह पत्नीची अटक व सुटका.


पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- मेहुण्याला धमकी दिल्याप्रकरणी माजी खासदार संजय काकडेंसह पत्नीची अटक व सुटका- याबाबत सविस्तर वृत्त असे की पुणे..भारतीय जनता पार्टीचे माजी राज्यसभा खासदार संजय काकडे व त्यांच्या पत्नी उषा काकडे यांना मेहुण्याला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुरूवारी सकाळी चतुःश्रुंगी पोलिसांनी अटक केली. 





दुपारी 12 वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. 
युवराज ढमाले ( वय40) यांनी या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. काकडे यांना अटक करण्यासाठी बुधवारी चतुःश्रुंगी पोलिसांचे पथक त्यांच्या घरी आणी कार्यालयात गेले होते.परंतु त्या ठिकाणी ते सापडले नाहीत. 





गुरूवारी सकाळी घरी जाऊन त्यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना दुपारी 12 वाजता न्यायालयात हजर करण्यात आले. 





यावेळी पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. काकडे दाम्पत्याला या प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला. ढमाले यांच्या वतीने विजयसिंह ठोंबरे यांनी बाजू मांडली. 





तक्रारदाराने आता हा कौटुंबिक वाद असून, दोन वर्षांपूर्वी धमकी दिल्याचा आरोप केला आहे. तक्रारदारासोबत या दोन वर्षात माझे आणी पत्नीचे साधे बोलणेही झालेले नसताना, मग आताच हे आरोप का केले याचे आश्चर्य वाटत आहे, आता या संदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. न्यायालयात आज प्रत्येकी 10 हजार रूपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. न्यायालयाच्या प्रक्रियेचे आम्ही पालन करत आहोत, असे संजय काकडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment