Breaking

Friday, 6 November 2020

मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- मोडनिंब येथील जि.प.प्राथमिक मुलांच्या शाळेतील शिक्षक अशोक ढोबळे गुरूजी यांना रोटरी नेशनल आवार्ड पुरस्काराने सन्मानित.


मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- मोडनिंब येथील जि.प.प्राथमिक मुलांच्या शाळेतील शिक्षक अशोक ढोबळे गुरूजी हे रोटरी नेशनल आवार्ड पुरस्काराने सन्मानित- याबाबत सविस्तर वृत्त असे की मोडनिंब रोटरी क्लब च्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा रोटरी नेशनल आवार्ड पुरस्कार हा मोडनिंब येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलांच्या शाळेत कार्यरत असणारे श्री. अशोक ढोबळे गुरूजी यांना मिळाला असून त्यांचे या पुरस्काराबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. 





ढोबळे गुरूजी हे मोडनिंब येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलांच्या शाळेत उपशिक्षक या पदावर कार्यरत असून ते अनेक उपक्रम हाती घेत असतात, प्रज्ञाशोध परिक्षा, कोरोना च्या काळात आॅनलाईन शिक्षण यामध्ये ते अग्रेसर आहेत, तसेच त्यांनी आतापर्यंत लोकवर्गणीतून स्मार्ट टिव्ही व त्यातून विद्यार्थ्यांना शिक्षण देणे ,मुक्तांगण व गुगलमीट च्या माध्यमातून आॅनलाईन शिक्षण देणे यावर त्यांचा भर आहे. 





तसेच त्यांनी आतापर्यंत शिक्षकांच्या विविध प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम पाहीले आहे, तसेच ते क्रिडा, सांस्कृतिक, स्पर्धा परिक्षा, कथाकथन, स्नेहसंमेलन, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन इत्यादी उपक्रम हे शाळेत राबवित असतात त्यामुळेच त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मोडनिंब रोटरी क्लबने त्यांना रोटरी नेशनल आवार्ड पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे, या पुरस्काराबद्दल त्यांचे शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष मोहन कुंभार सर, उपाध्यक्ष सचिन भाऊ खडके, केंद्रप्रमुख मा. सुभाष दाढे सर ,  व सर्व सदस्य,सदस्या तसेच मुख्याध्यापक गोरे सर व सर्व स्टाफ नी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment