Breaking

Friday, 6 November 2020

पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- तत्कालीन पंतप्रधानांच्या कार्यकाळात आरक्षणाचा विचार का झाला नाही...खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले.


पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार-तत्कालीन पंतप्रधानांच्या कार्यकाळात आरक्षणाचा विचार का झाला नाही..खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले- याबाबत सविस्तर वृत्त असे की सातारा- मराठा आरक्षण  संदर्भात बोलायला मी लहान आहे.राजकीय जेष्ठ नेते मंडळींनी आरक्षणाची भूमिका का मांडली नाही. त्यावेळेसचे पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांनी 1989 कालावधीत मंडल आयोगाच्या शिफारशी अंमलात आणल्या, मग त्याच वेळी मराठा समाजाला  आरक्षण देण्याचा विषय का पुढे आला नाही असा प्रश्न खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे. 






सातारा पालिकेचे नवीन उपाध्यक्ष मनोज शेंडे यांचे अभिनंदन करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आले होते, त्यावेळी पत्रकारांनी खासदार उदयनराजे भोसले यांना मराठा आरक्षणाच्या विषयावरती छेडले असता, मराठा आरक्षणावर मी आगामी काळात जाहिररित्या बोलेनच असे उदयनराजेंनी स्पष्ट केले. 






ते म्हणाले, मराठा आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे गेल्याने मराठा समाजात नाराजी आहे.मराठा आरक्षणात राजकारण केले जात असून ते प्रत्यक्षात लागू होण्यात अडचणी येत आहेत. आरक्षण दिले नाही तर मराठा समाजात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी बोलताना दिला आहे.

No comments:

Post a Comment