माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे-
पडसाळी येथे शेतकऱ्यांना ज्वारीच्या बियाणांचे वाटप -
कै सुरेश बापू पाटील प्रतिष्ठान तसेच तालुका कृषी कार्यालय यांच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत बळीराजा सेंद्रिय शेती बचत गटाच्या माध्यमातून पडसाळी गावांमध्ये शेतकऱ्यांना ज्वारीचे बियाणे वाटप करण्यात आला कोरणा काळात आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे कुठल्याही वस्तूला भाव नसल्याने त्याला मदत म्हणून बुधवारी बियांना वाटप करण्यात आला याप्रसंगी प्रगतशील शेतकरी कुर्मदास पाटील व तात्यासाहेब फरड यांच्या हस्ते बियाणांचे वाटप करण्यात आले. कै सुरेश बापू पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीने आजपर्यंत अनेक समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही भावना ठेवून शेतकरी गोरगरीब मजूर पोरगं यांच्यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येतात. याप्रसंगी भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश पाटील, विलास देशमुख, संतोष पाटील भाऊसाहेब, भरत पाटील, प्रवीण पाटील, महेश पाटील, दीपक पाटील, औदुंबर साळुंखे, सचिन मुटकुळे, मारुती फरड, प्रकाश पाटील, तात्या मुटकुळे, बापू सलगर, चंद्रकांत मुसळे, रामदास फरड, सुग्रीव फरड, वैभव देशमुख यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment