बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- बीड: गंगावाडी दत्त मंदिर ते राहेरी रस्त्याची दुरावस्था- * गंगावाडी गावातील दत्त मंदिर ते राहेरी रस्त्याची फार बिकट अवस्था झाली असुन. आज रोजी ह्या रस्त्यावरूण 75% लोक शेतात जाण्यासाठी रोज दैनंदिन वागतात. त्यामुळे शेतात जाण्यासाठी फार मोठी तारे वरची कसरत करावी लागत आहे. तरी हा रस्त्या नीट नसल्यामुळे काही लोकांचा वेचून ठेवलेला कापूस हा चोरीला गेला आहे.काही लोकांची मोसंबी जाग्यावरच गळुण गेली आहे. आजुन या रस्त्यावरच्या एकाही शेतकऱ्याच्या उसाला अजुन टोळी आलेली नाही. सर्वांनाच बैलगाडी घेऊन रोज तलवडा डांबर रोडने 8 किलोमीटर जावे लागते*
*त्यामुळे हा रस्त्या आज पर्यंत आपल्या तालुक्यातील व जिल्ह्य़ातील सर्वच राजकीय नेते यांनी कुणीही केला नाही.व याची साधी शासन दरबारी दखल सुध्दा घेतली नाही. कारण कि ह्या रस्त्याने ना त्यांना व त्यांच्या कुटुंबातील लोकांना व त्यांच्या मुला-बाळाला जायच नाही. ह्या रस्त्याने फक्त गावातील सर्व शेतकरी. मजुर. महिला व आपल्याच रोज जायच आहे.पण हा रस्त्या म्हणुनच राहिलाच नाही. ह्या रस्त्याला नदी नाल्याच रुप या रस्त्याला आले आहे.*
*त्यामुळे सर्व गावातील लोकांनी मिळुन जिल्ह्य़ातील प्रशासनाच्या विरोधात येत्या 9.11.2020. सोमवार या दिवशी कायदेशीर रित्या अमरण उपोषण करायचे ठरवले आहे. स्थळ गावातील दत्त मंदिर परिसरात हे उपोषण करण्याचे ठरवले आहे.*
*तरी गावातील सर्व शेतकरी बांधव. महिला मंडळ. तरूण मित्र. गावातील युवा कार्यकर्ते. तसेच सर्व राजकीय क्षेत्रातील लोकांनी आप.आपला राजकीय पक्ष बाजुला ठेवुन.व शाळेतील लहान व मोठी मुल.मुली. गावातील वयस्कर लोकांनी मिळून एकत्र यावे. तसेच आपण व आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने या दिवशी कृपया आपल्या शेतातील काम धंदे एक दिवस बंद ठेवून.आपण उपोषणास हजर रहावे. कारण रस्त्या असल्यावरच आपल्या शेतीला किंमत आहे. शेतातील पिकाला योग्य भाव मिळतो. व शेतीमाल योग्य वेळी मार्केट ला जातो. त्यामुळे आपल्याला ह्या मुख्य रस्त्याची खुप गरज आहे. व आपण सर्वांनीच एकत्र येउनच हा रस्त्या मार्गी लागेल. त्यामुळे आपण 9 तारखेला सर्वांनी एकत्र यावे अशी आपणास विनंती आहे.*
*लेखक एक रस्त्याग्रस्त शेतकरी :: यादव कृष्णा प्रल्हादराव. गंगावाडी.*
*.....🙏.....*


No comments:
Post a Comment