पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- राज्यात हलक्या पावसाची शक्यता- याबाबत सविस्तर वृत्त असे की बंगालच्या उपसागरात आग्नेय व नैॠत्य भागात वार्यांची स्थित असल्याने व त्याची तीव्रता येणार्या मंगळवार पर्यंत अजून वाढणार असून वारे वायव्येच्या दिशेस असलेल्या तामिळनाडू व पुद्दुचेरी, मल्लापुरम या भागाकडे सरकणार आहे, त्याचाच परिणाम मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही भागांवर होणार आहे, यामुळे या भागामध्ये बुधवार पासून काही ठिकाणी हलकासा पाऊस पडेल असा वेधशाळेने अंदाज वर्तविला आहे.
उत्तर भारतात असलेल्या थंडीचा परिणाम राज्यातील वातावरणावरती होऊ लागल्याने राज्यात हवामान कोरडे असल्यामुळे काही प्रमाणात थंडी वाजण्यास सुरूवात झाली आहे तर काही भागात चढउतार चालू आहे. दरम्यान पुणे शहरात किमान तापमान पारा सरासरीपेक्षा 4.1 अंश सेल्सिअसने वाढून 17.5 अंश सेल्सिअस नोंदले आहे. लोहगाव येथे 18.7 अंश सेल्सिअस पर्यंत किमान तापमान पार्याने उसळी मारली असून शहरात थंडी कमी झाली आहे.


No comments:
Post a Comment