मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- वारकरी संप्रदायाची मनसेचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांचेशी चर्चा-महाराष्ट्रातील वारकरी संप्रयदायातील प्रमुख महाराज, संतांचे वंशज यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची मुंबई येथे कृष्णकुंज निवासस्थानी प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे यांच्या समवेत भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
यावेळी देववृत वासकर महाराज, संजय महाराज चवरे, निवृत्ती महाराज नामदास, विष्णू महाराज कबीर, एकनाथ महाराज हांडे,रंगनाथ महाराज राशींकर, मोहन महाराज बेलापूरकर, जगन्नाथ महाराज देशमुख, रामकृष्ण हणमंत महाराज वीर आधी वारी प्रमुख उपस्थितीत होते.


No comments:
Post a Comment