Breaking

Friday, 6 November 2020

पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- पंढरपूर मध्ये मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा होणारच, संचार बंदीला मराठा आंदोलकांचा विरोध.


पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- पंढरपूर मध्ये मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा होणारच, संचार बंदीला मराठा आंदोलकांचा विरोध- याबाबत सविस्तर वृत्त असे की मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर ते मुंबई आक्रोश मोर्चा निघणार असल्याचे मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेत सांगितले होते, आणी त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी पंढरपूरात दोन दिवस संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत.






आणी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आणी आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्यात यावी तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे याकरिता पंढरपूर मधून मुंबई पर्यंत आक्रोश मोर्चा निघणार असल्याचे मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेत सांगितले होते परंतु जिल्हाधिकारी यांनी पंढरपूरात संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिल्याने या संचार बंदीला मराठा आंदोलकांनी विरोध केला असून पंढरपूर ते मुंबई आक्रोश मोर्चा निघणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment