मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- अतिक्रमण काढण्याबाबत मोडनिंब ग्रामपंचायतीला टाळे लावण्याचा गणेश नाईक यांचा इशारा- याबाबत सविस्तर वृत्त असे की मोडनिंब येथील युवक गणेश नाईक यांनी ते रहात असलेल्या आण्णा भाऊ साठे नगर मधील आण्णा भाऊ साठे नगर ते सुर्वे वस्ती कडे जाणार्या रस्त्यावरती अतिक्रमण वाढल्याने गणेश नाईक यांनी ते अतिक्रमण काढण्यासाठी मोडनिंब ग्रामपंचायतीला व पंचायत समिती कुर्डूवाडी येथे लेखी अर्ज दिले होते व अतिक्रमण काढण्यासाठी मागणी केली होती.
परंतु त्यांचे असे म्हणणे आहे की माझ्या अर्जाचा कोणताही विचार ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती ने केलेला नाही व पूर्वी गणेश नाईक यांनी अतिक्रमण काढण्यासाठी आण्णा भाऊ साठे नगर ते सुर्वे वस्ती कडे जाणार्या रस्त्यावरती एक टिपर मुरूम टाकून रस्ता अडवला होता परंतु त्यावेळी त्यांना फक्त आश्वासन देण्यात आले परंतु अतिक्रमण काढले नाही म्हणून त्यांनी अतिक्रमण काढण्यासाठी पंचायत समिती कुर्डूवाडी व मोडनिंब ग्रामपंचायतीला परत अर्ज देऊन मोडनिंब ग्रामपंचायतीला टाळे लावण्याचा गणेश नाईक यांनी इशारा दिला आहे.


No comments:
Post a Comment