मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- झोपडपट्टीतील नागरिकांना बेघर होऊ देणार नाही..आ.प्रणितीताई शिंदे- याबाबत सविस्तर वृत्त असे की कोनापुरे चाळ 10 नंबर शाळेजवळ वीस वर्षांपासून झोपडपट्टी आहे, 2012/13 साली 14/20 नागरिकांचे कर आकारणी गवसु कडून करण्यात आली होती,
यावेळी त्याच आधारे 12 नागरिकांचे कर आकारणी गवसु कडून करण्यात आली होती, त्या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचे वतीने मुलभुत सुविधा करण्यात आले आहे, ड्रेनेज लाईन,घरगुती चेंबर, नळ कनेक्शन व दिवाबत्ती करण्यात आली,
महानगरपालिकेचे आयुक्त साहेबांनी हे कर आकारणी पावती चुकीचे पद्धतीने झाले आहे म्हणून आयुक्त शिवशंकर साहेबांना त्या सर्व पावत्या रद्द करण्यात आले व प्रेस च्या माध्यमातून आयुक्त साहेबांनी ते सर्व बेकायदेशीर अतिक्रमण काढणार आहे असे सांगण्यात आले होते.
तेथील नागरिक व या भागातील नगरसेविका वैष्णवी ताई करगुळे व युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे यांच्या माध्यमातून आमदार प्रणितीताई शिंदे यांना सविस्तर माहिती सांगितली, यावेळी त्यांनी सांगितले की तुम्हाला कधीही बेघर होऊ देणार नाही व याबाबत मी प्रशासनाला जाब विचारेन व विधानसभेतही हा प्रश्न मांडून मार्गी लावला जाईल असे आश्वासन आ.प्रणितीताई शिंदे यांनी दिले आहे.


No comments:
Post a Comment