Breaking

Tuesday, 24 November 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- ई.डी.ची पीडा अनेकांच्या मागे लागण्याची शक्यता.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- ई.डी.ची.पीडा अनेकांच्या मागे लागण्याची शक्यता-विशेष सक्तवसुली संचालनालय
भारत सरकार अर्थात ई.डी.या भारत सरकारच्या स्पेशल अंगीकृत असणाऱ्या कार्यालयामार्फत उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोत पेक्षा अतिरिक्त
अवैध मार्गाने मिळवलेल्या उत्पन्नावर ती,कारवाई करण्यासाठी, विशेष सक्तवसुली संचालनालय भारत सरकारच्या वतीने,
अनेक कामे,मिळालेल्या माहितीवरून,
धाडी टाकण्यासाठी,सुरुवात केलेली आहे.विधिमंडळाचे ज्येष्ठ सदस्य तथा 







शिवसेना पक्षाचे,विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक यांना,सक्तवसुली संचालनालय भारत सरकार मुंबई यांचे वतीने,चौकशी करता ताब्यात घेतले आहे.यामुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून,माध्यमांचे कॅमेरे सध्या मुंबई येथील ई.डी.च्या कार्यालयाबाहेर थांबलेले आहेत. तर आमदार प्रताप सरनाईक हे घरी नसल्यामुळे, त्यांना समन्स पाठवण्याची तयारी सक्तवसुली संचालनालय संचनालय कार्यालयाचे वतीने सुरू आहे.सुरक्षा व्यवस्थेमध्ये अग्रेसर असणाऱ्या  टॉप कंपनीचे,कर्मचाऱ्यांची असणारे थकीत पगार, कंपनीच्या खात्यावरून झालेली हवालामार्फत चे बेकायदेशीर व्यवहार,बेनामी संपत्ती यासंदर्भात इन्फोसिस डायरेक्टर अर्थात सक्तवसुली संचालनालय,यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी आज दिवसभर धाडी टाकायला सुरुवात केली आहे.
आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना चौकशी करता ताब्यात घेतले असून  सक्तवसुली संचालनालय या कार्यालयांमध्ये दिवसभर कसून चौकशी केली  जाणार आहे.
सक्तवसुली संचालनालय या कार्यालयामार्फत यापूर्वी, विविध मोठ्या लोकप्रतिनिधींच्या वरती धाडी टाकून,अनेकांची कसून चौकशी केलेली आहे. यामध्ये विद्यमान मंत्री, छगन भुजबळ हे सध्या सक्तवसुली संचालनालयाय चे न्यायालयीन जामिनावरती बाहेर आहेत.तर विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी,विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यावर ती देखील धाड टाकून त्यांची कसून चौकशी केली होती.महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधींना या कार्यालयामार्फत नोटिसा काढण्यात आल्याची पक्की खबर,सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आहे.
यामध्ये अनेक जण काँग्रेस-राष्ट्रवादी शी संबंधित अनेकजण सत्ता वसुली संचालनालयाच्या रडारवर ती आहेत. दरम्यान केंद्रीय तपास यंत्रणा,न्यायव्यवस्था कायदा,भाजपच्या हातचे बाहुले असल्याची टीका,राज्यसभेचे खासदार श्री संजय राऊत यांनी केली आहे.तर कर नाही तर डर कशाला अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर येथे पत्रकारांशी बोलताना दिली.नव्या वर्षाच्या शुभमुहूर्तावरती 







ई.डी. ची पीडा अनेकांच्या मागे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे ही पीडा टाळण्यासाठी,अनेक जणांनी आपले मुक्काम हलवायला सुरुवात केलेली आहे.

No comments:

Post a Comment