संपादकीय-स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आज जन्मदिवस, त्यांचा जन्मदिवस हा बालदिन म्हणूनही साजरा केला जातो,
इंग्रज ज्यावेळी आपला देश सोडून निघून गेले त्यानंतर आपल्या देशाला उभारी देण्याचे व सक्षम बनवण्याचे काम पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी केले, त्यावेळी आपल्या देशात आर्थिक स्थिती अगदी हलाखीची होती
आणी अश्या परिस्थितीतून देशाला सावरण्यासाठी व प्रगती पथावर आणण्यासाठी चाचा नेहरूंनी सर्वतोपरी प्रयत्न केला, त्यांनी देशाचे आर्थिक धोरण मजबूत बनवले शिवाय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रिडा, कृषीविषयी, नौदल उभारणी, भूदल उभारणी, हवाई दल उभारणी असेल प्रत्येक बाबतीत त्यांनी लाख मोलाचे योगदान दिले आहे, त्याचबरोबर विदेशी धोरण असेल तेही त्यांनी प्रत्येक राष्ट्राशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून
आपले परराष्ट्र धोरण मजबूत बनवले व परदेशी गुंतवणूक भारतात आणली,
जलशुध्दीकरण योजना असो, शेतीसाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करून देणे असो, धरण बांधणी असो, सरकारी शाळा, IIT व Mit क्षेत्र असो, प्रत्येक बाबतीत त्यांनी देशाला
प्रगती पथावर आणण्यासाठी चाचा नेहरू नी प्रयत्न केले
परकीय चलन भारतात कसे आणले जाईल व त्याचे नियोजन कसे करता येईल व त्याचा विशेषत: तरूण वर्गाला कसा फायदा होईल याचाही त्यांनी बारकाईने विचार केला, युद्ध नौका उभारणी, शस्त्र साठा खरेदी करणे, औद्योगिकीकरण वाढवणे,कारखानदारी ला चालना देणे याही सर्व बाबतीत ते अग्रेसर होते
तसेच त्यांचे जेवढे राष्ट्रवर प्रेम होते तेवढेच त्यांचे लहान मुलांवरती प्रेम होते, ते नेहमी म्हणायचे लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असतात
ते कोणत्याही ठिकाणी कार्यक्रमाला जाऊद्यात तेथे लहान मुले असली की प्रथम ते त्यांच्याकडे जात व त्यांना आपल्या खिशातील चाॅकलेट देत, त्यांच्या बरोबर ते अगदी प्रेमाने वागत, व रमून जात, काही वेळा ते त्यांच्या बरोबर क्रिडाही खेळत असत, त्यांच्या कडे आपुलकी होती, प्रेम होते व राष्ट्रावरती प्रेम होते व म्हणून लहानांपासून ते थोरांना चाचा हे आपले वाटत व सर्वजण त्यांच्या वरती प्रेम करत,
अश्या दूरदृष्टी असलेल्या महान नेतृत्वाला त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
लेखन
संपादक
VBP NEWS विजयकुमार परबत


No comments:
Post a Comment