Breaking

Tuesday, 24 November 2020

पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- टेलिव्हिजन विश्वासाठी अत्यंत दुःखद बातमी.


पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- टेलिव्हिजन विश्वासाठी अत्यंत दुःखद बातमी- याबाबत सविस्तर वृत्त असे की टेलिव्हिजन विश्वासाठी आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेता आशिष राॅय यांचे निधन झाले आहे. दीर्घकाळापासून ते मुत्रपिंडाच्या आजाराचा सामना करत होते. 





किडनी फेल झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही काळापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आर्थिक चणचण देखील होती. त्यामुळे या आजारपणाच्या काळात त्यांनी अनेक समस्यांचा सामना केला होता. ससुराल सिमर का शिवाय अनेक टेलिव्हिजन मालिकांच्या माध्यमातून ते घराघरात पोहचले होते. पैशांची चणचण असल्याने त्यांच्या वरती नीट उपचार देखील झाले नव्हते. त्यांच्या एका मित्राने फेसबूकच्या माध्यमातून मदत देखील मागितली होती.

No comments:

Post a Comment