Breaking

Sunday, 22 November 2020

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - काॅमेडियन भारती सिंह ला अटक, गांजा घेत असल्याची दिली कबुली.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - काॅमेडियन भारती सिंहला अटक, गांजा घेत असल्याची दिली कबुली- काॅमेडियन भारती सिंह ला अटक करण्यात आली आहे. तिचा पती अभिनेता हर्ष लिंबाचीयाची ही चौकशी सुरू आहे. भारती सिंह आणि तिचा नवरा अभिनेता हर्ष लिंबाचीयाला एनसीबीने आधी समन्स बजावले होते. एनसीबीने भारतीच्या घरी धाड टाकून झाडाझडती केली. 






भारती सिंह च्या घरी संशयास्पद वस्तू सापडल्यानंतर एनसीबीच्या अधिकार्यांनी दोघांना शनिवारी सकाळी ताब्यात घेतलं. मग संध्याकाळी चौकशी नंतर भारतीला अटक करण्यात आली आहे व तिचा नवरा हर्षची चौकशी सुरू आहे. 






दरम्यान, एनसीबीने आज खार दांडा येथे कारवाई केली होती या ठिकाणाहून 21 वर्षीय तरूणाला ताब्यात घेण्यात आले आहे, त्याच्याकडे 15 बाॅटल एल.एस.डी.हे ड्रग आणी 40 ग्राम गांजासह नेट्राझेपम हे ड्रग्स स्वरूपातील औषध सापडले आहे.या ड्रग्ज पुरवठा करणार्या व्यक्तीच्या चौकशीत काॅमेडियन भारती सिंह आणी तिचा पती अभिनेता हर्ष यांचे नाव उघडकीस आले आहे.

No comments:

Post a Comment