महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी/ भारतात फेब्रुवारी महिन्यापासून ' कोव्हिशील्ड' च्या वितरणाला सुरूवात एवढ्या रूपयांमध्ये मिळणार लस- याबाबत सविस्तर वृत्त असे की - ' कोव्हिशील्ड ' ही लस भारतात फेब्रुवारी महिन्यापासून वितरित होण्यास सुरुवात होईल, या लसीची किंमत 500 ते 600 रूपये इतकी असेल, अशी माहिती सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी दिली आहे.
सिरम इन्स्टिट्यूट कडून पुढील महिन्यात केंद्र सरकार कडे ' कोव्हिशील्ड ' च्या तात्काळ मंजुरीसाठी अर्ज करण्यात येईल असं अदर पूनावाला यांनी सांगितले आहे.
सामान्य जनतेला मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून ही लस उपलब्ध होईल, ही लस साठवून ठेवण्यासाठी 2°C ते 8°C अंश सेल्सिअस तापमानाची गरज असेल,तर या लसीची एका डोसची किंमत 500 ते 600 रूपये इतकी असेल असे अदर पूनावाला यांनी सांगितले आहे.


No comments:
Post a Comment