बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- पदवीधर साठी शिरिष बोराळकरांना औरंगाबादमधून तिकीट- याबाबत सविस्तर वृत्त असे की भाजपने पदवीधर आणी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या चार उमेदवारांची घोषणा केली आहे. औरंगाबाद पदवीधर मतदार संघातून शिरिष बोराळकरांना संधी देण्यात आली आहे.
यासोबत संग्राम देशमुख, संदीप जोशी, नितिन धांडे यांनाही भाजपने तिकीट दिले आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे चार उमेदवारांची नावे सोमवारी जाहीर केले, यामध्ये पुणे पदवीधर मतदार संघातून संग्राम देशमुख, हे सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत, औरंगाबाद पदवीधर मतदार संघातून शिरिष बोराळकर, यांना तिकीट देण्यात आले आहे. इथे रमेश पोकळे यांच्या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू होती. पोकळे औरंगाबाद मतदार संघातील तगडे उमेदवार मानले जात होते.
मात्र भाजपने बोराळकर यांना तिकीट दिल्याने आता या लढतीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान नागपूर पदवीधर मतदार संघातून विद्यमान महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली. संदीप जोशी यांनी याअधीच महापालिका निवडणुक लढणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तर अमरावती शिक्षक मतदार संघातून नितिन धांडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.


No comments:
Post a Comment