सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - मोडनिंब मधील दलित वस्ती संदर्भात मोडनिंब चे माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजीराजे सुर्वे यांचा आत्मदहनाचा इशारा- याबाबत सविस्तर वृत्त असे की मोडनिंब मधील सन 2011 च्या लोकसंख्येवरून अस्तित्वात असलेल्या 35 दलित वस्त्यांपैकी कोणती वस्ती कोणत्या प्रभागात येते व त्या वस्तीचे नाव, लोकसंख्या व सांकेताक सह दाखला मिळावा म्हणून मोडनिंब चे माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजीराजे सुर्वे यांनी मोडनिंब ग्रामपंचायतीला लेखी अर्ज दिला आहे, ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक अर्ज देतेवेळी हजर नसल्याने त्यांनी हा अर्ज मोडनिंब ग्रामपंचायतीचे वरिष्ठ लिपिक अरूण सुर्वे यांचेकडे दिला आहे व दि.20/11/2020 पर्यंत माहीती न मिळाल्यास शिवाजीराजे सुर्वे यांनी पंचायत समिती कुर्डूवाडी अथवा ग्रामपंचायत मोडनिंब च्या समोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
मोडनिंब ग्रामपंचात निवडणूक 2020 च्या 2/11/2020 रोजी प्रसिद्ध झालेल्या ' अ' बाबत प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रमानुसार सन 2011 च्या लोकसंख्येवरून तयार केलेल्या प्रभाग रचनेत अनुसूचित जाती, जमाती यांची लोकसंख्या दर्शविणारा रकाना आहे. त्यात 1,2 आणी 4 या प्रभागातच अनुसूचित जाती, जमातीची लोकसंख्या दाखवली असून प्रभाग 3,5,6 मध्ये ही लोकसंख्या निरंक दाखवली आहे. सन 2011 च्या लोकसंख्येप्रमाणे गावात 35 दलित वस्त्या तयार केलेल्या आहेत असा उल्लेख शिवाजीराजे सुर्वे यांनी दाखल केलेल्या अर्जात केला आहे. व त्यावर आतापर्यंत जवळ जवळ 1 कोटी निधी खर्च केला आहे.
34 वस्त्या सोडून जी 1 वस्ती जाडकर वाडा या नावाने ग्रामपंचायतीच्या रेकाॅर्डला आहे तिची लोकसंख्या 150 आहे. व तिचा संकेतांक 15-11-4412 आहे. मात्र ती वस्ती कुठे अस्तित्वात आहे मला ज्ञात नाही असे शिवाजीराजे सुर्वे यांचे म्हणणे आहे.
तरी मोडनिंब गावच्या सर्व दलित वस्त्या कोणत्या प्रवर्गातील लोकसंख्येवरून तयार केलेल्या आहेत व कोणती वस्ती कोणत्या प्रभागात येते, त्यावस्तीचे नाव, तिची लोकसंख्या, वस्तीचा सांकेतांक व प्रभाग चालू प्रभाग रचनेप्रमाणे कोणत्या प्रभागात आहे असा उल्लेख
शिवाजीराजे सुर्वे यांनी ग्रामपंचायतीला दिलेल्या अर्जात केला आहे व ही माहिती दि.20/11/2020 पर्यंत न मिळाल्यास शिवाजीराजे सुर्वे यांनी पंचायत समिती कुर्डूवाडी अथवा ग्रामपंचायत मोडनिंब च्या समोर आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.


No comments:
Post a Comment