सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर -वीजबिल माफ न केल्यास एक लाख ग्राहकांचा मोर्चा काढणार; वंचित बहुजन आघाडीचा इशारा
सोलापुर : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सोलापूर शहर जिल्ह्यातल्या कोरोनाच्या लॉकडाऊन कालावधीमधील वीज बिल माफ झाले पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते तथा सो.म.पा.नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
या ठिय्या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष नगरसेवक गणेश पुजारी, महिला शहरअध्यक्ष नगरसेविका ज्योती बमगुंडे, जिल्हा कोषाध्यक्ष बबन शिंदे, युवा शहराध्यक्ष गौतम महाराज चंदनशिवे, बाळासाहेब तांबे, विजय बमगुंडे, जिल्हा अध्यक्ष नानासाहेब कदम जिल्हा उपाध्यक्ष अविनाश भडकुंबे, महिला उपाध्यक्ष मंदाकिनी शिंगे, हेमलता वाघमारे, सुजाता वाघमारे, चाचा सोनवणे, अनिरुद्ध वाघमारे, रवी थोरात, विनोद इंगळे, सुहास सावंत, सुरज गायकवाड, अभिजीत गायकवाड,महादेव गाडे. सिक्ंदर कांबळे, ॲड.मलिक कांबळे, शेरा मोकाशी, विशाल सर्वगोड, अमर वाघमारे आदी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment