Breaking

Wednesday, 18 November 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- हुलजंती यात्रेला ब्रेक, प्रशासनाची कडेकोट व्यवस्था.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- हुलजंती यात्रेला ब्रेक, प्रशासनाची कडेकोट व्यवस्था- याबाबत सविस्तर वृत्त असे की हुलजंती महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, गोवा या राज्यात प्रसिद्ध असणारी व पंढरपूर वारीच्या जोडीला असणारी पश्चिम महाराष्ट्रातील मंगळवेढा तालुक्यातील मौजे हुलजंती गावचे ग्रामदैवत सुक्षेत्र महालिंगराया या देवाच्या यात्रेला या वर्षी कोरोना महामारीमुळे ब्रेक मिळाला.






संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता सालाबाद प्रमाणे रूढी परंपरेनुसार होणारी यात्रा न होता प्रशासनाच्या आदेशानुसार ती अगदी साध्यापणाने साजरी करण्यात आली. रूढी परंपरेनुसार अमावस्येच्या आदल्या दिवशी मानाचे मानकरी यांचा नैवेद्य दाखविणे,रात्री ठिक 12 वाजेनंतर शिवपार्वती यांचे कैलासावरून या भूतलावावरती आगमन व महालिंगराया देवास आहेर मुंडास अर्पण इत्यादी कार्यक्रम करणे, जातीवंत मेंढ्याची बोली लावून किंमत ठरविणे, देवाच्या बैलाची मिरवणूक काढणे, गावातील मुख्य पुजारी यांचा नैवेद्य गाजत - वाजत वनातील मंदीरात घेऊन जाणे,तसेच दुपारी अडीच वाजल्यापासून बिरोबा,सोन्याळ विठोबाराया, खसगी बरगालसिद्ध, बिज्जरगी- बुळाप्पा, शिरढोण- शिलवंती,






 बिरोबा-जिराअंकलंगी- बिरोबा,उटगी- ब्रम्हदेव, व ग्रामदैवत महालिंगराया देवाच्या पालखीसह असणार्या एकूण नऊ देवांच्या पालख्यांचा अभूतपूर्व असा असणारा व डोळ्यांचे पारणे फेडणारा, नयनरम्य असा भेटीचा भव्य- दिव्य सोहळा इत्यादी मोठे कार्यक्रम हे कोरोना पार्श्वभूमीवर मा.जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे तंतोतंत पालन करण्यासाठी रूढी परंपरेने होणारे सर्व कार्यक्रम हे रद्द करून भक्तांच्या भावना दुखावू नये यासाठी आवश्यक असणारे मोजकेच कार्यक्रम अगदी साध्यापणाने साजरे करण्यात आले. विशेषतः कर्नाटक राज्यातील भाविकांच्या महालिंगराया दर्शनासाठी भेटीपोटी असणार्या अतूट श्रद्धेपोटी किरकोळ अपवाद वगळता सर्व उत्सव हे शांततेत कोरोनाच्या नियमांचे पालन करून साजरे करण्यात आले. मा.जिल्हाधिकारी यांचे आदेशाप्रमाणे यात्रा होऊ नये म्हणून ग्रामपंचायत हुलजंती यांच्याकडून पूर्व तयारी म्हणून महालिंगराया देवस्थान समितीस सूचना, निवेदन, गावात दवंडी देऊन जनजागृती, भ्रमणध्वनी द्वारे निरोप, मेसेज, गावात फलक, गावातील मंदिर हे यात्रा काळात बंद करणे,गावातील स्थानिक ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये म्हणून पुरेसा प्रकाश मिळण्यासाठी दिवाबत्ती, गावातील झुडपे तोडून गावस्वच्छता, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, पाणीपुरवठा, आरोग्याची सोय, कोरोना जनजागृती फलक, इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात आली असल्याने माहिती गावच्या मावळत्या सरपंच मॅडम सौ.भाग्यश्री चंद्रकांत मासाळ यांनी दिली आहे.



तसेच तालुक्याचे तहसीलदार स्वप्नीलजी रावडे , गट विकास अधिकारी सौ चव्हाण मॅडम, तालुका पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे साहेब , ग्रामपंचायत कर्मचारी संतोष जामदार , व स्थानिक युवक देवस्थान कमिटी गावकऱ्यांच्या सदरचा उत्सव शांततेत पार करण्यात असल्याची माहिती गावचे विद्यमान ग्राम सेवक ए टी कोळेकर यांनी दिली.



No comments:

Post a Comment