मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार-मनसेमुळे १४५०० सिडको सोडतधारकांना मोठा दिलासा - सर्व सिडको सोडतधारकांनी पक्षाविषयी कृतज्ञाता व्यक्त करत राजसाहेबांना मानपत्र दिलं.
सिडकोच्या सन २०१८-१९ च्या कालावधीत निघालेल्या घरांच्या सोडतीत १४५०० जणांना आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांतील घरं मिळाली होती. ह्या घराचे मुद्रांक शुल्क शासन निर्णयानुसार १००० रुपये असणं अपेक्षित होतं पण त्या निर्णयाची अंमलबजावणी नीट न करता उलट सदनिकाधारकांना लाखो रुपयांचे मुद्रांक शुल्क आकारलं जाणार होतं.
ह्या विषयात सदनिकाधारकांनी सिडकोला पत्रं पाठवली, मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या, पण तरीही त्यांना न्याय मिळत नव्हता. परंतु नवी मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा विषय लावून धरला. नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे ह्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सैनिकांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सदनिका धारकांना आता फक्त १००० रुपयेच मुद्रांक शुल्क भराव लागणार आहे.
ह्यातील १७२६ सदनिका धारक असे देखील होते ज्यांना लॉकडाऊनमुळे आलेल्या आर्थिक अडचणींमुळे हप्ते न भरता आल्यामुळे त्यांची घरं सिडकोने रद्द केली होती, त्यांना देखील घरं मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.


No comments:
Post a Comment