Breaking

Thursday, 8 October 2020

बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- खानदेशाची मुलूख मैदानी तोफ धडाडणार बिहारमध्ये.


बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- खानदेशाची मुलूख मैदानी तोफ धडाडणार बिहारमध्ये- याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या बिहारमधील विधानसभेच्या निवडणुका होत आहेत, आणी या निवडणुकीत शिवसेनेने आपले बिहार मध्ये उमेदवार उभे केले आहेत, व बिहार विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून खानदेश चे व शिवसेनेचे आमदार धडाडीचे वक्ते मंत्री ना.गुलाबराव पाटील यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केली आहे अशी माहीती शिवसेना पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.


तसेच ते एक अनुभवी व धाडसी व्यक्तिमत्व असलेले नेते आहेत, त्यांचा नेहमीच शिवसेना पक्षाला निवडणुकीत
फायदा झाला आहे व ते नेहमी आतापर्यंत पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वी पणे पार पाडतात त्यामुळे शिवसेनेने त्यांच्या वरती ही जबाबदारी टाकली आहे व ही जबाबदारी आपण यशस्वीपणे पार पाडू व सहकार्यांच्या मदतीने व बिहार मधील स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांना व नेत्यांना सोबत घेऊन बिहार निवडणुकीत शिवसेनेला नक्कीच यश प्राप्त होईल असे मंत्री पाटील म्हणाले.

No comments:

Post a Comment