बीड जिल्हा प्रतिनिधी/ राज्यात कृषी विधेयक लागू न केल्याने राहूरीत भाजपाचे आंदोलन- याबाबत सविस्तर वृत्त असे की केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी हिताच्या विधेयकाला राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दिलेली स्थगिती उठवण्यात यावी, या मागणीसाठी मा.आ.शिवाजी कर्डीले यांच्या नेतृत्वाखाली राहूरी तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले, राज्य सरकारने दिलेली स्थगिती उठवण्यात यावी अन्यथा आगामी काळात मोठ्या परिणामांना सामोरे जावे लागले, असा इशारा माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांनी दिला आहे, यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले, दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक कृषी विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करून घेतले, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यास मान्यता दिली आहे, 70 वर्षानंतर शेतकरी दलालांच्या जोखडातून मुक्त झाला आहे, या ऐतिहासिक निर्णयाचे देशातील शेतकर्यांनी स्वागत केले आहे, असे असताना राज्यातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडी सरकारने त्या विधेयकास स्थगिती दिली आहे, या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी भयभीत झाला असून पुन्हा दलालांच्या जोखडात अडकण्याची भीती त्यास वाटत आहे,या नवीन कायद्यामुळे देशातील शेतकरी बंधमुक्त आणी दलालांच्या जोखडातून मुक्त होऊन त्याला आपल्या कष्ठाने पिकवलेल्या शेतमालाच्या विक्री व बाजारपेठेचे स्वातंत्र्य मिळणार आहे, शेतकर्यांसाठी एक देश व एक बाजारपेठ असणार आहे, आपला शेतमाल शेतकर्यांना कुठेही विकण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे, त्यामुळे शेतकरी हितासाठी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या विधेयाकवरती महाराष्ट्र राज्य सरकारने लावलेली स्थगिती उठवण्यात यावी अन्यथा आगामी काळात आंदोलन करण्याचा इशारा मा.आ.शिवाजी कर्डीले यांनी दिला आहे .
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment