मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- लातूर येथील तरूणाने केला रेकाॅर्ड ब्रेक-लातूर च्या तरूणाने एक आगळावेगळा मार्ग निवडून त्यातही रेकाॅर्ड ब्रेक करून लातूरच्या वैभवात भर घातली आहे आणि पुन्हा एकदा लातूर पॅटर्नचा एक वेगळेपणा दाखवून दिला आहे.
लातूर येथील रहिवासी चि. प्रतीक राजकुमार फुटाणे या इंजिनिअरींगच्या 22 वर्षीय तरूणाने 13 दिवसात 7820 कि.मी. 14 राज्य आणि 2 केंद्रशासीत प्रदेश अशी भारत देशाची *सुवर्ण चतुष्कोनाची* परीक्रमा *एकट्याने* मोटारसायकल वर पूर्ण करणारा सर्वात कमी वयाचा तरूण असा नवीन रेकाॅर्ड प्रस्थापित केला आहे.
प्रतीक यांच्या या रेकाॅर्डची नोंद *इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड* मध्ये होणार आहे.
त्यांचा या परीक्रमेचा संदेश होता Don't Drink & Drive आणि Save Girl Child भारतामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू होतात. स्री भ्रूण हत्येचे प्रमाणही जास्त आहे. भारतातील मुला-मुलींचे घटत जाणारे गुणोत्तर प्रमाण हा या परीक्रमेचा *Save Girl Child* असा संदेश होता.
त्यांचा प्रवासाचा मार्ग असा होता-
लातूर येथून दि. 19/9/2020 रोजी सकाळी 10 वाजता प्रस्थान केले,
लातूर-हैद्राबाद-विजयवाडा-विशाखापट्टणम-भुवनेश्वर-कलकत्ता-झारखंड-बिहार-वाराणसी-दिल्ली-जयपूर-उदयपूर-अहमदाबाद-सुरत-मुंबई-पुणे-बेंगलोर-चेन्नई-विजयवाडा-हैद्राबाद-लातूर
प्रवासात आलेल्या अडचणींवर मात करून दि.1ऑक्टोबर 2020 रोजी सायंकाळी 7वाजता लातूर येथे सुखरूप आणि यशस्वीपणे आगमन झाले.


No comments:
Post a Comment