Breaking

Saturday, 31 October 2020

मुंबई शहर व नवी मुंबई प्रतिनिधी/ विशाल खडके- येथून पुढे लोकायुक्तांकडे करता येणार आॅनलाईन तक्रार.


मुंबई शहर व नवी मुंबई प्रतिनिधी/ विशाल खडके- येथून पुढे लोकायुक्तांकडे करता येणार आॅनलाईन तक्रार- याबाबत सविस्तर वृत्त असे की लोकप्रतिनिधीसह, सरकारी कर्मचारी, अधिकारी यांच्या भ्रष्टाचार व गैरव्यवहारासंदर्भात लोकायुक्तांकडे तक्रार करण्यासाठी आॅनलाईन व्यवस्था करण्यात आली आहे. 





राज्याचे लोकायुक्त कार्यालयात प्रत्यक्ष, पोस्टाद्वारे, तक्रार दाखल करण्याच्या पारंपारिक व्यवस्थेसोबतच आता ईमेल किंवा संकेतस्थळावर आॅनलाईन पद्धतीने तक्रार अर्ज दाखल करता येणार असल्याची माहिती राज्याचे उप लोकायुक्त संजय भाटीया यांनी दिली आहे. 






मंत्रालयासमोरील नवीन प्रशासकीय इमारतीतील लोकायुक्त कार्यालयात तक्रार दाखल करता येईल, याशिवाय, लोकायुक्त कार्यालयाच्या http://lokayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच lokayukta@maharashtra.gov.in,   upalokayukta@maharashtra.gov.in,  uplokayukta2@maharashtra.gov.in, या इमेल वरतीही तक्रार दाखल करता येईल.

No comments:

Post a Comment