राज्यात MPSC च्या परीक्षेस 2,61,000 विद्यार्थी बसणार आहेत,या पुर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षा नंतर मुलाखत घेऊन निवड प्रक्रिया होणेस काही कालावधी लागणार आहे.सदर पुर्व परीक्षा दि. 07 एप्रिल 2020 रोजी त्यावेळेस कोरोनाचे कारण सांगून या परीक्षा पुढे ढकलल्या होत्या, यानंतरच्या काळात मराठा आरक्षणावर अंतरीम स्थगिती आली. MPSC च्या परीक्षेचे फॉर्मस् भरताना SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वयाची सवलत 43 आहे. आरक्षण स्थगितीमुळे खुल्या प्रवर्गाच्या वयाची 38 अट लागु झाली,तर38 ते 43 व पीएसआय 31 ते 3४ यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी बाद होतील,दि. 07 एप्रिल 2020 रोजी कोरोनाचा विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखखण्याच्या अनुषंगाने MPSC ने परीक्षा पुढे ढकलल्या तर आज कोविडची महामारी कमी झालेली नसताना तसेच सर्व शासकीय कार्यालयात कोरोना मुळे कर्मचाऱ्यांची उपस्थिती फक्त 50% ठेवन्याचे शासन आदेश असताना, फक्त 200 जागांकरिता २,६१,००० विद्यार्थ्यांना वेठीस धरून परिक्षेचा अट्टाहास म्हणजे मराठा आरक्षणावरील स्थगितीच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे होईल, सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाचा स्टे उठविण्यासाठी शासनाने प्रयत्न करण्या ऐवजी २०० जागांची परीक्षा घेण्याचे प्रयोजन काय ?
मग सोबत जोडलेल्या ७ एप्रिल च्या आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्या प्रमाणे covid ची महामारी संपली नसल्याने तसेच राज्यात जमावबंदीचे १४४ कलम लागू असताना परीक्षा का घेत आहात ?
आयोगाने परीक्षेचा निकाल सर्वोच्च न्यायालयातील निकाल नंतर जाहीर करणार असे जाहीर केले याचा अर्थ स्थगिती उठली नाही तर अनेक विद्यार्थी वयाच्या अटीवर आपोआप बाद होतील त्यामुळे आयोगाने व शास्नानाने यात स्पष्ट भूमिका घेतली नसल्याने राज्यातील MPSC च्या परीक्षेस विरोध करण्याचे आजच्या बैठकीत ठरले .
प्रथम स्थगिती उठवा नंतरच पुढे परीक्षा घेण्यात याव्यात. ११ तारखेला परीक्षा सेंटरवर गनिमी कावा होणार परीक्षा होऊ देणार नाही अशी भूमिका छत्रपती संभाजी राजे, महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला, यावेळी गंगाधर बनबरे(राष्ट्रीय प्रवक्ते), विकास पासलकर(केंद्रीय निरीक्षक) ,सुहास राणे(महाराष्ट्र उपाध्यक्ष),दिनेश महाडिक (मुंबई विभागीय अध्यक्ष),मारुती खुटवड (नविमुंबई जिल्हा अध्यक्ष), जनार्दन शिरावले (नविमुंबई महानगर अध्यक्ष,मिलिंद कदम(ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष),श्रीकांत गिरी, धनंजय सुरवसे,सुर्यकांत भोसले (माजी जिल्हा अध्यक्ष नविमुंबई),सुनिल कोठावळे (दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष) तसेच १००च्या आसपास संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते उपस्थित होते.
#मराठाआरक्षण
#संभाजीब्रिगेड
#SambhajiBrigade
#MarathaReservation


No comments:
Post a Comment