बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- चांदूर बाजार चे नायब तहसीलदार यांच्या कुटुंबियांकडून आ.बच्चू भाऊ कडू यांचे आभार- याबाबत सविस्तर वृत्त असे की काही दिवसांपूर्वी चांदूर बाजार चे नायब तहसीलदार यांचा अपघात झाला होता व उपचारासाठी त्यांना हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते व उपचारासाठी मोठी आर्थिक रक्कम लागणार होती,
तहसीलदार साहेबांच्या कुटूंबातील सदस्यांचा आ.बच्चू भाऊ कडू यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी म्हणून फोन आला होता व लगेचच आ.बच्चू भाऊ कडू यांनी घटनेची माहिती घेऊन कर्मचारी अपघात विम्यातून आ.बच्चू भाऊ कडू यांनी मदत मिळवून दिली व त्यामुळे तहसीलदार साहेबांवरती वेळीच उपचार झाले व नंतर आ.बच्चू भाऊ कडू यांना भेटण्यासाठी तहसीलदार साहेबांच्या कुटूंबातील सदस्यांचा फोन आला व आ.बच्चू भाऊ कडू यांनी हाॅस्पीटलमध्ये जाऊन तहसीलदार साहेबांच्या तब्येतीची चौकशी केली व यावेळी केलेल्या मदतीबद्दल तहसीलदार साहेबांच्या कुटूंबातील सदस्यांनी आ.बच्चू भाऊ कडू यांचे आभार मानले.


No comments:
Post a Comment