Breaking

Saturday, 31 October 2020

मोहोळ तालुका प्रतिनिधी/ संभाजी वागज- राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत डिकवलकर प्रथम तर देबडवार द्वितीय.


मोहोळ तालुका प्रतिनिधी/ संभाजी वागज-राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत डिकवलकर प्रथम तर देबडवार द्वितीय

अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला - क्रिडा मंचच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यातील शिक्षकांच्या स्वरचित काव्यलेखन स्पर्धेत भास्कर डिकवलकर (ठाणे) हे राज्यात सर्वप्रथम आले असून रविंद्र देबडवार (सोलापूर) हे द्वितीय तर वैशाली राऊत (कोल्हापूर) यांनी तृतीय क्रमांक पटकावला.






अनुराधा विभुते सोलापूर,सुरभी राऊत नवी मुंबई,कविता सोनवणे ठाणे,सुरेखा कांबळे सांगली आणि रेखा फाले पुणे यांचा उत्तेजनार्थ क्रमांक आला.






या स्पर्धेतून शिक्षकांमधील लेखन शैली वृद्धींगत व्हावी व त्याचा सर्वदूर प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने राज्यातील शिक्षकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देणेसाठी नटराज मोरे संस्थापक अध्यक्ष यांनी अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला - क्रिडा मंचची स्थापना केली.याद्वारे दरमहा एका विषयावर काव्यलेखन,काव्यगायन,कथालेखन/ललितलेखन,कला,कलाविष्कार अशा पाच स्पर्धा घेतल्या जातात.यात जि.प.प्राथ.शाळा शेटफळ येथे प्राथ.शिक्षक म्हणून कार्यरत असणारे रविंद्र देबडवार यांनी यश मिळवल्याने संस्थापक अध्यक्ष नटराज मोरे,परीक्षण समिती प्रमुख प्रकाश साखरे,श्रीम.हर्षल साबळे,सचिन कुसनाळे यांसह सर्व राज्य व जिल्हा सदस्यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment