*आदरणीय सन्माननीय श्री. साईदास ( तात्यासाहेब) चह्वाण प्रथम आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, तात्यासाहेबांचा आणी आमचा परिचय हा 5 वर्षा पूर्वी आला, तात्यासाहेब हे पहिल्यांदा जि.प .प्राथमिक मुलींची शाळा* *मोडनिंब या शाळेचे सदस्य झाले, तात्यासाहेब हे अत्यंत हुशार चाणाक्ष , प्रामाणिक पणा अंगी भरलेले व शांत स्वभाव असलेले व्यक्तिमत्व , एक चांगला माणूस, समाजसेवक तात्यासाहेबांच्या रूपाने शाळेला मिळाला हे शाळेचे भाग्यच, तात्यांनी आजपर्यंत शाळेसाठी दिलेले योगदान हे अमूल्य आहे, प्रसंगी शाळेत अनेक कार्यक्रम घेत असताना या माणसाने कधीच कसलाही विचार केला नाही, स्वतः च्या खिशाला झळ बसली तरी चालेल परंतु शाळेतील कार्यक्रम हा पार पडलाच पाहीजे अशी भावना* *त्यांनी आजपर्यंत शाळेसाठी ठेवली, शाळेत काम करत असताना त्यांनी नेहमीच विद्यार्थ्यांच्या हिताचाच विचार केला, त्यांनी शाळेत काम करत असताना कधीच दुजाभाव केला नाही, स्वतः च्या मुला बाळांप्रमाणे इतर मुले असतात आणी त्यांचाही शैक्षणिक दृष्ट्या विकास झाला पाहिजे अशी भावना तात्यांनी आजपर्यंत शाळेसाठी ठेवली, शाळेत* *त्यांनी कधीच राजकारण केले नाही किंवा आणले नाही, सदैव तत्पर राहून विद्यार्थ्यांच्या हिताचाच विचार केला व शाळेचे स्नेहसंमेलन असो, सहल असो, प्रजासत्ताक दिन असो, स्वातंत्र्य दिन असो अगदी सर्वांना सोबत घेऊन शांततेने काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न तात्यांनी केला अगदी स्वतः च्या खिशाला झळ देऊन, तात्यासाहेब नेहमी म्हणायचे की लहान मुले ही देवा प्रमाणे असतात व पुढे जाऊन ते देशाचे* *उज्वल भविष्य घडवत असतात त्यामुळे त्यांच्या बाबतीत कोणतीही कसर रहायला नको अशी शाळेच्या बाबतीत तात्यांची भावना आजपर्यंत* *राहीलेली आहे, अगदी प्रत्येक गोष्टीकडे चांगला दृष्टीकोन ठेवून बघण्याची तात्यांची पद्धत खरोखरच शाळेला वळण लावून गेली आणी अशी खूप कमी माणसे असतात जी सकारात्मक दृष्टीने, चांगले विचार असणारी व शाळेसाठी निस्वार्थी पणे योगदान देणारी तात्यासाहेबांसारखी खूप कमी माणसे आहेत आणी खर्याला खरे व खोट्याला खोटे म्हणायची हिंमत ही केवळ निस्वार्थी पणे काम करणार्या अशा माणसातच असते खरोखरच तात्यासाहेब आपण या पाच वर्षात शाळेसाठी दिलेले योगदान हे अमूल्य आहे व आपल्या सारखीच माणसं प्रत्येक शाळेला जर मिळाली तर हे त्या शाळेचे भाग्यच* *समजतो, अशा आदर्श, स्वच्छ, निस्वार्थी,हुशार, चाणाक्ष बुद्धी, व प्रामाणिक, व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो व आपणास उत्तम आरोग्य लाभो हीच आई जगदंबा चरणी प्रार्थना व उदंड आयुष्याच्या लक्ष लक्ष शुभेच्छा ...*
Sunday, 11 October 2020
संपादकीय/ वाढदिवस अभिष्टचिंतन.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment