Breaking

Sunday, 11 October 2020

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर चे सुपूत्र अर्जून पुरस्कार विजेते सुयश जाधव यांचा संघर्ष.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर चे सुपूत्र अर्जून पुरस्कार विजेते सुयश जाधव यांचा संघर्ष- याबाबत सविस्तर वृत्त असे की सुयश जाधव हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर चे सुपूत्र सुयश जाधव चे वडील हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटू होत लहानपणापासूनच जलतरणाचे (पोहण्याचे) बाळकडू हे त्याला त्याच्या वडिलांकडूनच मिळाले, लहानपणी खेळत असताना सुयशला विजेचा धक्का बसला होता आणी त्यातच त्याला त्याचे दोन्ही हात कोपर्यापासून गमवावे लागले आणी तरी पण त्याने जिद्द व चिकाटी सोडली नाही, हात नसतानाही तो लिहायला शिकला आणी अशातच त्याच्या लक्षात आले की आपण हात नसतानाही लिहू शकतो मग पोहू का शकत नाही मग जिद्दीच्या व चिकाटीच्या भरवशावर तो पोहायलाही शिकला आज सुयश आंतरराष्ट्रीय दर्जावर भारताचे प्रतिनिधित्व करतोय आणी खरोखरच  सुयश कडे बघितल्यावर जिद्द व चिकाटी जर असेल तर माणूस कुठे जाऊन पोहोचतो हे आपल्या सोलापूर जिल्ह्यातील सुयश जाधव चे उत्तम उदाहरण आहे, VBP न्यूज चा अशा योद्ध्यास सलाम.

No comments:

Post a Comment