मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेत नवीन पदाधिकार्यांच्या नियुक्त्या- याबाबत सविस्तर वृत्त असे की
नाशिक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापकीय अध्यक्ष आदरणीय श्री. राजसाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष मा. संजय नाईक यांच्या आदेशानुसार तसेच मनसेचे प्रदेश सरचिटणीस मा. अशोकभाऊ मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. मा. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष मा. अनंतभाऊ सूर्यवंशी व मा. दिलीपभाऊ दातीर, शहराध्यक्ष मा. अंकुशभाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना नाशिक जिल्हा व शहर नूतन पदाधिकाऱ्यांची नवनियुक्ती करण्यात आली.
आज मंगळवार दिनांक ०६.१०.२०२० रोजी पक्षाच्या मध्वर्ती कार्यालय ‘राजगड’ येथे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. मा. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष मा. अनंतभाऊ सूर्यवंशी, शहराध्यक्ष मा. अंकुशभाऊ पवार यांच्या हस्ते सर्वश्री अजिंक्य बोडके (जिल्हा उपाध्यक्ष), उदय मुळे (जिल्हा उपाध्यक्ष), अजय सिंग (शहर उपाध्यक्ष), मयूर कुकडे (शहर उपाध्यक्ष), महेंद्र सोनवणे (शहर सरचिटणीस), विवेक खरे (देवळाली विभाग अध्यक्ष), अमित सालीन्स (नाशिक रोड विभाग अध्यक्ष), विल्सन साळवी (नाशिक रोड विभाग उपाध्यक्ष), संदेश आडके (नाशिक रोड विभाग सरचिटणीस), आदर्श बोर्डे (देवळाली विभाग सरचिटणीस), चंद्रभान ताजनपुरे (नाशिक रोड विभाग उपाध्यक्ष), संजय हांडोरे (नाशिक रोड विभाग चिटणीस) यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
या प्रसंगी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. मा. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष मा. अनंतभाऊ सूर्यवंशी, शहराध्यक्ष मा. अंकुशभाऊ पवार, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष जावेद शेख व निकीतेश धाकराव, मनविसे जिल्हाध्यक्ष कौशल (बब्बू) पाटील, रस्ते आस्थापना जिल्हाध्यक्ष अभिजित गोसावी, शहर उपाध्यक्ष अक्षय खांडरे, सिद्धेश सानप, अक्षय कोंबडे, व महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment