Breaking

Thursday, 8 October 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- वंचित बहुजन आघाडी च्या वतीने हाथरस घटनेच्या निषेधार्थ आंदोलन, सरण रचून केला घटनेचा निषेध.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- वंचित बहुजन आघाडी च्या वतीने हाथरस घटनेच्या निषेधार्थ आंदोलन, सरण रचून केला घटनेचा निषेध- याबाबत सविस्तर वृत्त असे की वंचित बहुजन आघाडीच्या वतीने
हाथरस घटनेच्या निषेधार्थ स्मशानभूमीत आंदोलन
सरण रचून घटनेचा केला निषेध.. 
- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हाथरस येथे दलित तरुणीवर झालेल्या सामुदायिक बलात्कार घटनेचा निषेध म्हणून अहमदनगर येथे  स्टेशन रोड येथील स्मशानभूमीत आंदोलन केलं होते,  आंदोलकांनी सरण रचून त्यावर बसण्याचा प्रयत्न केला असता पोलीसांनी त्यांना अडवले. यावेळी उत्तरप्रदेशच्या योगी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात माजी युवक जिल्हाध्यक्ष सागर भिंगारदिवे, सुनिल शिंदे, विजय गायकवाड, जीवन कांबळे, संदिप गायकवाड, विनोद गायकवाड आदि सहभागी झाले होते.
हाथरस प्रकरणाचे तीव्र पडसाद देशभर उमटत आहे. नगरमध्येही आज वंचित बहुजन आघाडीने स्मशानभूमीत आंदोलन करुन पिडीत तरुणीला न्याय मिळण्याच्या मागणीसाठी सरण रचले. सदर खटल्याची सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमुर्ती मार्फत विशेष चौकशी समिती गठित करण्यात येऊन 30 दिवसाच्या आत चार्जशीट तयार करण्यात यावा, सदर खटला उत्तरप्रदेश बाहेर मुंबई, चेन्नई, कोलकता अथवा दिल्ली उच्च न्यायालयात चालविण्यात यावा, पीडित मुलीचा अंतिम संस्काराच्या नावाखाली महत्वपुर्ण पुर्नतपासणीचे पुरावे नष्ट केल्या प्रकरणी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक व त्यांना आदेशीत करणार्‍या मंत्र्यावर 302, 120 अन्वये गुन्हे दाखल करुन त्यांच्यावर अटकेची कारवाई करावी, या घटनेतील फिर्यादी व त्यांचे कुंटुबीय व साक्षीदारांना संपुर्ण संरक्षण देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागण्या मान्य न झाल्यास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या सुचनेनूसार तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment