बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- तो पर्यंत राज्यातील शाळा, काॅलेजस सुरू होणार नाहीत- कोरोना ने राज्यात हाहाकार माजविला आहे, त्याच पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालयांकडून शिकवला जाणारा अभ्यासक्रम ग्राह्य धरला जाणार असून, त्या आधारेच परिक्षा घेतल्या जातील मात्र कोरोना परिस्थितीत सुधारणा झाल्यावर शाळा, महाविद्यालये सुरू होतील असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
सावित्रीबाई फुले विद्यापीठातर्फे घेतल्या जाणार्या आॅनलाईन आॅफलाईन परिक्षांचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उदय सामंत बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च शिक्षण संचालक धनराज माने, विद्यापीठाचे कुलसचिव डाॅ. प्रफुल्ल पवार, परिक्षा मूल्यमापन मंडळाचे डाॅ. महेश काकडे आदी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment