मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार-शेवगाव तालुका काँग्रेस सेवा दल कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी- दिनांक 2आॅक्टोंबर
शेवगाव तालुका काँग्रेस सेवा दल कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून सुरुवात करण्यात आली.त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला काँग्रेस सेवा दल कमिटीच्या वतीने पुष्पहार घालण्यात आला शेवगाव तालुका काँग्रेस सेवा दल कमिटीच्या वतीने सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या हाथरस येथील राहुल गांधी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्या चा निषेध करण्यात आला त्यानंतर शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात असे म्हटले आहे की राहुल गांधी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्या बाबत गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी शेवगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली. यावेळी जिल्हा जनरल सेक्रेटरी समीर काझी सेवादल ,तालुका अध्यक्ष सुधीर बाबर, शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश मगरे, संघटक प्रकाश तुजारे,
अध्यक्ष अँड बाळासाहेब शिंदे, सेवादल तालुका ॲड.शशीराज भारस्कर जनरल सेक्रेटरी ॲड हिरामण म्हस्के ,शेवगाव शहर अध्यक्ष जमीरभाई शेख, महिला तालुका अध्यक्ष शहीदाबी शेख, भातकुडगाव गट अध्यक्ष बाळासाहेब काळपुंड दहिगाव गट प्रमुख मच्छिंद्र तावरे, मागासवर्गीय सेवादल अध्यक्ष कचरू मगर, सेवादल समन्वयक अशीफभाई काझी ,समद काझी निसर भाई शेख यावेळी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment