Breaking

Sunday, 4 October 2020

माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- अवैद्य वाळू वाहतूक करणार्या वाहनावरती कारवाईचा सिलसिला चालूच.


माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे-*अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावरती कारवाईचा सिलसिला चालूच*:- माढा तालुक्यातील टेंभुर्णी परिसरात  २७ सप्टेंबरपासून  अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावरति धडक कारवाईचा सिलसिला चालू  असून १ ऑक्टोबर रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलीस नाईक अमोल पोपट बचुटे यांनी  अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा एक टिपर क्रमांक (एम एच. १०. झेड. ४६५) त्याच्यामध्ये साडेतीन ब्रास वाळू त्याची किंमत रू. २४५०० असा मिळून १५,२४,५०० रुपये किंमतीचा  मुद्देमाल जप्त केला असून गुन्हा रजिस्टर नंबर ५४० / २०२० भारतीय दंड विधान कलम ३७९/ ३४ प्रमाणे टेंभुर्णी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल झाला असून यामध्ये गणेश भारत बनसोडे (वय. २९) योगेश कांबळे (वय. २६) रा. दोघेही अकोले (खुर्द) तालुका माढा यांच्यावरती गुन्हा दाखल झाला असून टेंभुर्णी करमाळा रोड वरती हा टिप्पर मिळून आला. शासनाची कोणतीही रॉयल्टी न भरता वाळू चोरून वाहतूक करीत असताना मिळून आल्याने त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे उपविभागीय पोलिस अधिकारी करमाळा डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल बचुटे यांनी ही कारवाई केली असून पुढील तपास टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष  पोलीस निरीक्षक  राजकुमार केंद्रे  यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. स्वामीनाथ लोंढे हे करीत आहेत . 
या वाळू वाहतुकीमध्ये शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडवण्यासाठी महसूल कर्मचारी वाळूचे ठेके न होऊ देण्यासाठी प्रयत्नशील असतात त्याचाच फायदा पोलिस कर्मचाऱ्यांची वाहने वाळू वाहतुकीच्या रॅकेटमध्ये सामील असल्यामुळे तोंडदेखली कारवाई केली जाते.  त्या गोष्टीला महसूल कर्मचारी व अधिकारी, राजकीय नेते, छुपी साथ देत असून वाळू वाहतूक करणारे मोठे रॅकेट आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी स्वतः लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत असून. प्रशासनाने यांची गंभीर दखल घ्यावी टेंभुर्णी मध्ये मटका बुकी घेणारे १७ मालक असून भिमानगर येथे अवघा एक मटका एजंट पकडून १३०० रुपये चा मुद्दे माल जप्त ची कारवाई टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे  कर्तव्यदक्ष पोलिसांनी केलेली आहे. या तुलनेमध्ये फार मोठी कारवाई होणे अपेक्षित असताना फक्त  एक  एजंट पकडून  १३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला जातो ही लांच्छनास्पद गोष्ट असून पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने या कारवाई मध्ये लक्ष केंद्रित करून जुगार, मटका, गुटका, गांजा, अवैध दारू विक्री यांच्यावरती कारवाई होणे अपेक्षित आहे अशी सर्वसामान्य जनतेची मागणी असून याची दखल सोलापूर चे पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाला घ्यावी  लागणार असे दिसते आहे. कारण टेंभुर्णी पोलीस मटका बुकी, गुटखा, जुगार आड्डे, अवैध दारू  विक्री यांच्या कडून  मिळणाऱ्या चिरी मिरी  मुळे त्यांच्यावर कारवाई करेल अशी परिस्थिती नाही.या गंभीर परिस्थिती कडे सोलापूर चे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व पोलीस अधिक्षक लक्ष देतील काय?

No comments:

Post a Comment