Breaking

Monday, 5 October 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- शिरूर मतदार संघातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 761 च्या डांबरीकरणाचा भूमिपूजन सोहळा.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- शिरूर मतदार संघातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 761 च्या डांबरीकरणाचा भूमिपूजन सोहळा- शिरुर लोकसभा मतदारसंघातील बेल्हे-शिरुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७६१ च्या डांबरीकरणाचा भूमीपुजन सोहळा पार पडला. राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेअंतर्गत हे काम करण्यात येतेय.यामुळे या भागातील जनतेची मोठी सोय होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ ला जोडून हा रस्ता सुरु होतो. तो पुढे श्री बेल्हेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीजवळून जातो. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊनच या मार्गाची आखणी करण्यात आली असून या भागातील दळणवळण अधिक सोयीचे होणार आहे.या कार्यक्रमाला आमदार अतुलशेठ बेनके, आमदार निलेशजी लंके, पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे,जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे,श्री गणपतरावजी फुलवडे,पांडूरंगजी पवार यांसह प्रशासकीय अधिकारी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment