मोडनिंब प्रतिनिधी / मौजे मोडनिंब मधील गोरे वस्ती येथे रस्त्यांची दुरावस्था- याबाबत सविस्तर वृत्त असे की मौजे मोडनिंब येथील रेल्वे स्टेशन च्या पाठीमागे गोरे वस्ती आहे , त्या गोरे वस्ती मध्ये पावसाळ्यात रस्त्यांची दुरावस्था होत असून नागरिकांची गैरसोय होत आहे,
ठिक ठिकाणी रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत व पावसाळ्यात तर नागरिकांना पायी ये जा सुद्धा करता येत नाही व रस्त्यावरती मोठ मोठे खड्डे पडलेले असल्याने तेथे छोटे मोठे अपघातही घडून येतात व पावसाळ्यात रस्त्यांची भरपूर प्रमाणात दुरावस्था होत आहे व नागरिक या गोष्टीला कंटाळून गेले आहेत, तेथील नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार यासंदर्भात विनंती करूनही प्रशासन ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही असेच दिसून येते.


No comments:
Post a Comment