Breaking

Friday, 25 September 2020

मोडनिंब प्रतिनिधी /अक्षय खंदारे - चौदाव्या वित्त आयोगातील मंजूर कामे चालू करण्याची वंचित बहुजन आघाडी ची मागणी.


मोडनिंब प्रतिनिधी/अक्षय खंदारे - चौदाव्या वित्त आयोगातील मंजूर कामे चालू करण्याची वंचित बहुजन आघाडी ची मागणी- याबाबत सविस्तर वृत्त असे की वंचित बहुजन आघाडी चे माढा तालुका उपाध्यक्ष सिद्धार्थ आप्पा शेंडगे यांनी गटविकासाधिकारी पंचायत समिती कुर्डूवाडी यांना नुकतेच एक निवेदन दिले आहे व त्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की मोडनिंब ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोगातून विविध प्रकारची कामे मंजूर केली आहेत व ती कामे मंजूर देखील आहेत व ती कामे लवकरात लवकर सुरु न केल्यास व त्याची रक्कम परत गेल्यास यास सरपंच व ग्रामसेवक हेच जबाबदार असतील व त्यांच्याकडूनच ती रक्कम वसूल केली जावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी चे माढा तालुका उपाध्यक्ष सिद्धार्थ आप्पा शेंडगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे व यासंदर्भात कार्यवाही न झाल्यास वंचित बहुजन आघाडी च्या वतीने पंचायत समिती समोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेंडगे यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment