सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्य निवडणूक प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब आडसूळ लढवणार .
पंढरपूर (प्रतिनिधी)
राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष व मंत्रालय समन्वय समिती मुंबईचे विद्यमान सदस्य आणि पुणे विभागाचे मा. शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांचे कट्टर समर्थक व विश्वासू बापूसाहेब आडसूळ हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत विद्यापीठ आधीसभेसाठी पदवीधर मतदारसंघातून दहा जागांसाठी यावर्षी होणाऱ्या निवडणुकीत ते सक्रिय होणार आहेत असे समजते.
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम व जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची मिटिंग नुकतीच संपन्न होऊन त्यामध्ये एक मताने बापूसाहेब आडसुळ यांना उभा करण्याचा निर्णय घेतलेला आहे बापूसाहेब आडसूळ हे गेले वीस वर्ष झालं शैक्षणिक,सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आतिशय उल्लेखनीय काम करीत असून त्यांचा पदवीधर व शिक्षकांमधील संपर्कही दांडगा आहे याचा फायदा निश्चितपणे त्यांना होणार आहे.
श्री तुळजाभवानी बहुउद्देशीय समाजसेवी संस्था, सार्थक बहुद्देशीय समाजसेवी संस्था या संस्थेचे ते संस्थापक सचिव असून या माध्यमातूनही त्यांचं शैक्षणिक व सामाजिक कार्य सतत चालू असून त्यामाध्यमातून त्यांचा मोठा संपर्क आहे याचा फायदा निश्चितपणे त्यांना होणार असून सोलापूर जिल्ह्यातील सर्व संघटना पदाधिकारी,पत्रकार संघातील सर्व पदाधिकारी कामाला लागलेले आहेत. या त्यांच्या उमेदवारीमुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळते. तरी सर्वांनी 15 जून पर्यंत जास्तीत जास्त नाव नोंदणी करावी असे आव्हान प्रदेशाध्यक्ष व मंत्रालय समन्वय समिती सदस्य बापूसाहेब आडसूळ व सर्व मित्रपरिवार यांनी केले आहे .
No comments:
Post a Comment