Breaking

Sunday, 14 November 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - बहुजन सत्यशोधक संघाचे अध्यक्ष सुनिल ओहोळ यांचा सामाजिक न्याय भवन समाजकल्याला विविध मागण्यांसंदर्भात आंदोलनाचा इशारा.


*बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओहोळ यांनी सोलापूर यथे सामाजिक न्यायभवन समाज कल्याण ला संघटनेच्या वतीने प्रलिंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा इशारा *


बहुजन सत्यशोधक संधाचे वतीने 
सामाजिक न्यायभवन वरील नामफलक खराब झालेले आहे, प्रवेशद्वारावरील झाडांच्या फांद्या काढण्यात यावेत, सातरस्ता चौकामध्ये सामाजिक न्यायभवन दिशा दर्शक फलक बसवण्यात यावा, विद्यार्थ्यांचे  शिष्यवृत्ती ताबडतोब देण्यात यावी यावेळी
बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय
 अध्यक्ष सुनील  ओहोळ
यावेळी म्हणाले,आपल्या बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन वरील नामफलक खराब झालेले असून नवीन नामफलक बसवण्यात यावे तसेच प्रवेशद्वारावरील झाडांच्या फांद्या काढण्यात यावेत त्याच प्रमाणे सातरस्ता चौकामध्ये सामाजिक न्यायभवन दिशा दर्शक फलक बसवण्यात यावे जेणेकरून सर्व सामान्य नागरिकांना न्यायभवन मध्ये येण्यास मदत होईल तसेच 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाचा पहिला दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला परंतु नामफलक बदलला नाही तसेच सर्व विद्यार्थ्यांचे विद्यार्थिनीचे शिष्यवृत्ती ताबडतोब देण्यात यावी अन्यथा आपल्या कार्यालय समोर संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात येईल त्यानंतर होणाऱ्या परिणामास आपण जबाबदार असाल याची नोंद घ्यावी, असा इशारा बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओहोळ 
यांनी दिला यावेळी.
 जिल्हा युवक अध्यक्ष महादेव गाडे महावीर वजाळे  उपाध्यक्ष नितीन वाघमारे बापूसाहेब शिंदे कपिल शिताफळे आदर्श लोंढे दादा जवंजाळ आप्पासाहेब ओहोळ महेंद्र शिंदे सुरेश वाघमारे शशिकांत ओहोळ सुधीर लंकेश्वर व सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment